कराड येथे शनिवार १७ सप्टेंबर रोजी 'आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान समारंभ.
कराड येथे शनिवार १७ सप्टेंबर रोजी 'आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान समारंभ.
कराड- प्रतिनिधी.
येथील आदरणीय पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा 'आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान समारंभ शनिवार, दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी (आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या १४ व्या 'स्मृतिदिनी') सकाळी ११ वाजतां यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन, कराड येथे आयोजित करण्यात आला आहे.
सन २०२२ चा पुरस्कार, माननीय प्रा. डॉ. श्री शिवाजीराव कदम, कुलपती, भारती
मधुकर भावे, जेष्ठ संपादक व विचारवंत यांचे शुभहस्ते व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील यांचे अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
प्रतिष्ठानचेवतीने सकाळी ९.३० वाजतां आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांच्या श्री शिवाजी हायस्कूल शेजारील 'समाधीस्थळी' पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
आदरणीय स्व. पी. डी. पाटीलसाहेब यांना अभिवादन करण्यासाठी व आदरणीय पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान समारंभाकरिता, साहेब प्रेमी कराडकर आणि परिसरातील नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर व सर्व विश्वस्तांच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment