Posts

Showing posts from January, 2021

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या मंत्रालय व विधिमंडळ संपर्क प्रमुख सागर पाटील यांची निवड.

Image
  माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या मंत्रालय व विधिमंडळ संपर्क प्रमुख  सागर पाटील यांची निवड. सातारा: माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र फाऊंडेशन अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या मंत्रालय व विधिमंडळ संपर्क प्रमुख पदी मंद्रुळकोळे (पाटील आवाड)  ता.पाटण येथील मा. सागर दिलीप पाटील  यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. माहिती अधिकार, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार व पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिपक कांबळे, राष्ट्रीय महासचिव श्री कमलेश शेवाळे, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री महेश सारणीकर, यांच्या संमतीने,महाराष्ट्र राज्य उपाध्यश अमर बेंद्रे, महाराष्ट्र राज्य सचिव सुभाष भोसले,महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख श्री इद्रीस सिद्दीकी  यांच्या शिफारसीने राष्ट्रीय लोकशाही विचारधारेला अभिप्रेत व लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य ही लोकशाही संकल्पना यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येयधोरणे लोकशाही भारताच्...

कराड तालुक्यातील 200 ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर.

Image
  कराड तालुक्यातील 200 ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर. कराड दि.29 (प्रतिनिधी) कराड तालुक्यातील 200 ग्रामपंचायतीसाठी आज कराडचे तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी येथिल यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात सरपंच आरक्षण जाहिर केले. ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण 25 सरपंचपपदे जाहिर करण्यात आली त्यामध्ये 13 महिलांसाठी तर 12  खुली आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गात 1 पद खुले आहे.नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 54 पदे जाहिर झाली असून त्यामध्ये 27 महिला तर 27 खुली आहेत. तालुक्यात सरपंचपदासाठी खुल्या प्रवर्गात 120 पदामध्ये 60  महिला तर 60 पदे खुली आहेत. आज जाहिर झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीमध्ये कराड तालुक्यातील सन 2020 ते 2025 पर्यंत सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करिता सरपंच आरक्षण आज जाहीर करण्यात आले यामध्ये गोडवाडी, अक्काईचीवाडी, नारायणवाडी, शितळवाडी, नांदलापूर, बाबरमाची, वसंतगड, चिंचणी, हणबरवाडी, वनवासमाची (स.गड), अंधारवाडी, सावरघर, नानेगाव, संजयनगर (शेरे), बेलदरे वनवासमाची (खोडशी), धावरवाडी, भवानवाडी, शिंगणवाडी, अंबवडे, मेरवेवाडी,...

प्रजासत्ताक दिन पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण.

Image
  प्रजासत्ताक दिन पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण. सातारा, दि.26 (जि.मा.का.) : शासनाने  राज्याचा अधिकाधिक विकास  करण्यावर भर दिला आहे.  या विकास प्रक्रियेत आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी  मी कटीबद्ध असून  जिल्ह्याच्या समातोल विकासावर  भर राहणार आहे, अशी ग्वाही देवून पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर परेड कमांड बाळसाहेब आलदारयांच्या नेतृतवाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली.   यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले,  जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी  यांच्यासह नागरिक उपस्थित होते...

जि.प.प्राथमिक शाळा मंद्रुळकोळे (पाटील आवाड) येथे बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

Image
  जि.प.प्राथमिक शाळा मंद्रुळकोळे (पाटील आवाड) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. "मंद्रुळकोळेचे  तंटामुक्ती   अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन." कराड : जि.प.प्राथमिक शाळा मंद्रुळकोळे (पाटील आवाड)ता.पाटण जि.सातारा येथे  प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी तंटामुक्ती अध्यश बाळासाहेब पाटील कंडकटर,  यांच्या हस्ते जि.प.प्राथमिक शाळा पाटील आवाड मध्ये झेंडावंदनाचा  कार्यक्रम पार पडला.यावेळी माजी तंटामुक्ती अध्यश अशोकराव पाटील,बाजीराव पाटील सर,पत्रकार सागर पाटील,शाळेच्या मुख्याध्यापिका पोदार मॅडम,जानुगडे मॅडम,विक्रम पाटील,सचिन सुतार,दगडू सुतार,अंगणवाडी सेविका विजया पाटील,वंदना सुतार,शाळेतील विद्यार्थी, व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

21 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.

Image
  21 संशयितांचे  अहवाल कोरोनाबाधित.               सातारा दि.25 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 21 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.   कोरोना बाधित अहवालामध्ये         सातारा तालुक्यातील सातारा 2, सदरबझार 1,  शाहुपुरी 2,  शनिवार पेठ 1, कृष्णानगर 1, सासुर्वे 1, जकतावाडी 1,अंबेधरे 1, अतित 1, खर्शी 1,  नेर 1, पाटण तालुक्यातील  मारुल हवेली 1, फलटण तालुक्यातील  अलगुडेवाडी 1, सुरवडी 1, साखरवाडी 1, खटाव तालुक्यातील  मांडवे 3, जाखनगाव 1, निढळ 1, निमसोड 1, वडूज 1   माण तालुक्यातील पिंगळी 1, दहिवडी 1, राजवडी 1,  गोंदवले खु 2, गोंदवले बु 6,  शेवरी 1, कोरेगाव तालुक्यातील  अनपटवाडी 1, खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2,   महाबळेश्वर तालुक्यातील   इतर जांभुळणी 1,              एकूण नमुने- 308910         *ए...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

Image
  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ  साठे विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन. सातारा दि. 22 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ  साठे विकास महामंडळातर्फे मातंग व तत्सम 12 पोट जातीतील गरजूंसाठी  अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छुकांनी अर्ज जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (म.) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, सातारा येथील कार्यालयातून घेऊन  सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पां. भ. गिऱ्हे यांनी केले  आहे.             मातंग व तत्सम 12 पोट जातीतील मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी, मांग, मांग महाशी, मदारीराधे मांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादीगा या जातीतील लोकांना अर्ज करता येतील.                                                                 ...

पाचवडफाटा येथे सेवा रस्त्यावर नाल्याचे सांडपाणी.

Image
पाचवडफाटा येथे सेवा रस्त्यावर नाल्याचे सांडपाणी. दि. 25 : पाचवडफाटा, ता. कराड  येथील महामार्गालगतच्या सेवा  रस्त्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून नाल्याचे सांडपाणी साचून राहिले  आहे. याच पाण्यातून वाहनधारक ये-जा करत आहेत. याकडे रस्ते विकास  महामंडळचे दुर्लक्ष होत असून हे रस्ते विकास महामंडळ फक्त नावालाच आहे का ? असा सवाल वाहनधारक व नागरिक व्यक्त करत आहेत.कित्येक दिवसांपासून  पाचवड फाटा येथे सेवा रस्त्यावर नाल्याचे  पाणी येत असून सदरच्या  रस्त्यावर ते साचून राहत आहे. अशीच परिस्थिती  सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी  पहावयास मिळत आहे. सेवा रस्त्याचे काम करताना नाल्याचे व्यवस्थापन व  सांडपाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने काम होणे गरजेचे होते. परंतु त्या  कामात त्रुटी राहिल्यामुळे ही परिस्थिती सध्या निर्माण झाल्याची चर्चा   नागरिक करत आहेत. या सेवा रस्त्यावरुन ये-जा करताना वाहनधारकांना  त्रासाचे होत आहे. त्यामुळे या साचून राहिलेल्या पाण्यासंदर्भात  कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज  निर्माण झाली आहे. त्याकडे रस्ते ...

“एक हरित चळवळ, वृक्षलागवडीचा महाप्रयोग” पुस्तकाचे प्रकाशन.

Image
  “एक हरित चळवळ, वृक्षलागवडीचा महाप्रयोग” पुस्तकाचे प्रकाशन . मुंबई : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रधान सचिव  विकास खारगे  यांनी लिहिलेल्या “एक हरित चळवळ, वृक्षलागवडीचा महाप्रयोग” पुस्तकाचे प्रकाशन केले. वृक्षलागवड ही आवड व छंद म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी असे सांगून राज्यात वृक्ष लागवडीची मोहीम सुरू करण्याचे सूतोवाच त्यांनी केले.  source - twitter @Shivsena

कराड तालुक्यातील सुमारे 85 प्रकरणातून महसूल विभागाला 4 कोटी 55 लाख 7 हजार 360 रुपये येणे बाकी असल्याने संबंधितांना नोटिसा बजावल्या.

Image
  कराड तालुक्यातील सुमारे 85 प्रकरणातून महसूल विभागाला 4 कोटी 55 लाख 7 हजार 360 रुपये येणे बाकी असल्याने संबंधितांना नोटिसा बजावल्या. कराड : गौण खनिज संबंधाने कराड तालुक्यातील सुमारे 85 प्रकरणातून महसूल विभागाला 4 कोटी 55 लाख 7 हजार 360 रुपये येणे बाकी असल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान 21 मिळकतधारकांच्या जमिनी सरकार जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. तर 14 मिळकतधारकांच्या जमिनीवर असणारा सरकारी बोजा पैसे भरल्यामुळे कमी करण्यात आला आहे. 50 जणांना सरकारी बोजा नोंद करण्याबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून यामुळे लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे अशी माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली. कराड तालुक्यातील गौण खनिज प्रकरणी म्हणजेच वाळू, मुरूम, माती अवैधरित्या उत्खनन केल्याप्रकरणी 85 जणांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बहुतांश करून वाळू उत्खनन व वाळू साठा अवैधरित्या अनेकांनी केला असल्यामुळे सदरची कारवाई 1997 पासून करण्यात आलेली प्रकरणे प्रलंबित आहेत. या अनुषंगाने महसूल विभागाने  दंडात्मक केलेली कारवाईची रक्कम वसूल करण्याच्या अनुषंगाने नोटिसा बजाव...

शिधापत्रिकेला लाभार्थ्यांचे आधार लिंक नसल्यास 1 फेब्रुवारीपासून, सार्वजनिक व्यवस्थेवरील मिळणारे धान्य होणार बंद.

Image
  शिधापत्रिकेला लाभार्थ्यांचे आधार लिंक नसल्यास 1 फेब्रुवारीपासून, सार्वजनिक व्यवस्थेवरील मिळणारे धान्य होणार बंद. सातारा दि.21 (जिमाका): राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि एपीएल (केशरी) शेतकरी योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याचा लाभ घेणा-या सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक सिडींग करण्यासाठी अंतिम मुदत  ३१ जानेवारी २०२१ ही देण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक या मुदतीत लिंक होणार नाहीत त्यांना  १ फेब्रुवारी २०२१ पासून सवलतीच्या दरातील अन्नधान्याचा लाभ घेता येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि एपीएल (केशरी) शेतकरी योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याचा लाभ घेणा-या सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक सिडींग १०० % पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार मोबाईल सिडींग सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष मोहिम राबविणेचे निर्देश शासनस्तरावरुन देणेत आलेले आहेत....

67 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु.

Image
   67 संशयितांचे  अहवाल कोरोनाबाधित;  2 बाधितांचा मृत्यु.               सातारा दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  तर  2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.   कोरोना बाधित अहवालामध्ये          *सातारा तालुक्यातील*  सातारा 2, देगांव रोड 1, फडतरवाडी 1,म्हसवे 2, आसनगांव 1,भाटमरळी 1, तासगांव 3, कोडोली 1, करंजे 1, केसरकर पेठ 1,मंगळवार पेठ 1,   *कराड तालुक्यातील*   शनिवार पेठ 1, भरेवाडी 1, ठाकुर्की 1, फडतरवाडी 1,   *पाटण तालुक्यातील*    *फलटण तालुक्यातील*  लक्ष्मीनगर 1, साखरवाडी 1, बरड 1,लक्ष्मीनगर 1,  *खटाव तालुक्यातील*    मायणी 1, वडुज 1, नागनाथवाडी 1,     *माण तालुक्यातील*   फलटण 1, मोगराळे बिजवडे 4, गोंदवले बु. 3, पळशी 1, पिंगळी 2,  *कोरेगाव ताल...

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण पोलीस मित्र फाऊंडेशनच्या सातारा जिल्हा महिला उपाध्यक्षपदी सौ. सोनाली चव्हाण यांची निवड.

Image
  माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण पोलीस मित्र फाऊंडेशनच्या सातारा जिल्हा महिला उपाध्यक्षपदी सौ. सोनाली चव्हाण यांची निवड. सातारा: माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र फाऊंडेशन अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी जिंती ता.पाटण येथील सौ. सोनाली चव्हाण यांची सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. माहिती अधिकार, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार व पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिपक कांबळे, राष्ट्रीय महासचिव श्री कमलेश शेवाळे, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री महेश सारणीकर, यांच्या संमतीने, महाराष्ट्र राज्य प्रवक्ता गणेश शिंदे, महाराष्ट्र राज्य सचिव श्री इद्रीस सिद्दीकी महाराष्ट्र राज्य सह संपर्कप्रमुख सागर पाटील यांच्या शिफारसीने राष्ट्रीय लोकशाही विचारधारेला अभिप्रेत व लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य ही लोकशाही संकल्पना यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येयधोरणे लोकशाही ...

मोरणा विभागासह पाटण तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंची डरकाळी,पाटणकर गटाला धक्का.

Image
  मोरणा विभागासह पाटण तालुक्यात  गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंची डरकाळी,पाटणकर गटाला धक्का.  मोरगिरी /किशोर गुरव मोरणा विभागातील निवडणूक लागलेल्या १० ग्रामपंचायती पैकी आठ ग्रामपंचायती वर शिवसेना पुरस्कुर्त देसाई गटाचा झेंडा फडकवला आहे. यामध्ये आंबेघर तर्फ मरळी बिनविरोध, गोकुळ तर्फ पाटण देसाई गट ४ व पाटणकर ३ सत्तांतर,वाडीकोतावडे देसाई गट ३ व पाटणकर गट २ ,धावडे बिनविरोध, पाचगणी बिनविरोध, आटोली बिनविरोध, कोकिसरे देसाई गट ९ व पाटणकर गट ० , पेठ्शिवापूर देसाई गट ५ व अपक्ष २ या ग्रामपंचायतींचा सामवेश आहे.काहीर या एका ग्रामपंचायती मध्ये देसाई गट  ३ व पाटणकर गट ३ असे समसमान उमेदवार निवडून आले आहेत.डोंगळेवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पुरस्कुर्त पाटणकर गटाची सत्ता अबाधित राहिली असून देसाई गट २ व पाटणकर ४ असे उमेदवार राहिले आहेत.एकंदरीत मोरणा विभागात देसाई गटाचा बालेकिल्ला अबाधित राहिला असून मोरणा विभागासह पाटण तालुक्यात  गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंनि  डरकाळी फोडली असून पाटणकर गटाला तालुक्यात जोरदार धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला  मिळत आहे.  ...

हणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषीत. जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी.

Image
  हणबरवाडी त्रिज्येतील 10 कि.मी. क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषीत. जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी. सातारा दि.17 (जिमाका): कराड तालुक्यातील मौजे हणबरवाडी येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले असून मृत्युचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसल्याने कोंबड्यांना कोणते आजार झाले हे अनिष्कर्षीत असल्याने रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  या अनुषंगाने मौजे हणबरवाडी ता. कराड येथील सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी प्रतिबंध नियंत्रण अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार मौजे हणबरवाडी ता. कराड येथील 10 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र सतर्क भाग म्हणून आदेशान्वये जाहीर केला आहे. या आदेशानुसार प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या ये-जा करण्यसास मनाई करण्यात आली असून त्या ठिकाणची खासगी वाहने प्रभावित परिसराच्या बाहेर लावण्यात यावीत. प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणास वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच...

घोगाव येथील शिवराष्ट्र नर्सिंग सायन्सेस कालेज चा निकाल १०० टक्के.

Image
  घोगाव येथील शिवराष्ट्र नर्सिंग सायन्सेस कालेज चा निकाल १०० टक्के. उंडाळे - प्रतिनिधि,  घोगाव ता कराड येथील शिवराषटर नर्सिंग सायन्सेस कालेज चा प्रथम वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला असून या कॉलेज च्या वतीने पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे यांचे हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देवुन गौरविण्यात आले या वेळी प्राचार्य आशा जुकूनुर उपस्थित होत्या.या वेळी बोलताना प्राचार्य म्हणाल्या या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थीनी यांना शिक्षणाची चांगली संधी मिळाली आहे. या संस्थेने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख जनमानसात निर्माण केली. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

लोकनायक, राजकारणातील लोहपुरुष ,पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता नेता हरपला.

Image
लोकनायक, राजकारणातील लोहपुरुष ,पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता नेता हरपला.               ब्यूरो रीपोर्ट -  प्रतापसिंह संभाजीराव जगताप.                      माजी सहकार मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचे दिनांक 4 /1 /2021 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आज त्यांच्या उत्तरकार्य विधी त्यानिमित्ताने श्री प्रतापसिंह जगताप यांनी त्यांना वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली.माजी सहकार मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर हे राजकारण सहकार तसेच समाजकारणातील एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय राहिले स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा त्यांना लाभलेला होता त्यामुळे देश प्रेम त्यांच्या नसानसात भरलेले होते गांधी-नेहरूंच्या विचारांवर त्यांची मोठी श्रद्धा होती यशवंतरावजी चव्हाण हे यांच्या राजकारणातील आदर्श होते, जिल्हा परिषद सदस्य या रूपाने त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली त्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य, सातारा जिल्...

परिवर्तनाच्या अत्युच्च टोकावरील महानायिका- जिजाऊ सावित्री (भिमराव परघरमोल)

Image
  परिवर्तनाच्या अत्युच्च टोकावरील महानायिका- जिजाऊ सावित्री.       अकोला - भिमराव परघरमोल. ...नववर्षाच्या सुरुवातिलाच म्हणजे जानेवारी महिन्यात राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन परिवर्तनाच्या अत्युच्च टोकावरील महामेरू असणाऱ्या महानायिका यांचा जयंती उत्सव सगळीकडे मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा केला जातो. त्याला कारणही तसेच आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या उत्थानासाठी, दिन दुःखिताच्या विकासासाठी, स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी खर्ची घातले. त्यासाठी त्यांनी आजन्म संघर्ष करत  जीवन अर्पण केले.                  *दोन्ही कडून समृद्ध वारसा*             राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले यांना माहेर आणि सासर दोन्ही बाजूने समृद्ध वारसा लाभलेला होता. जिजाऊंचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील  पराक्रमी तथा बलाढ्य सरदार राजे लखुजीराव जाधव व आई माळसाबाई यांच्या पोटी १२ जानेवारी १५९८ रोजी झाला . राजेशाही वारसा लाभलेला असल्...

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनाने शैक्षणिक व सहकार क्षेत्रात मोठी पोकळी.

Image
  महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनाने शैक्षणिक व सहकार क्षेत्रात मोठी पोकळी. उंडाळे- प्रतिनिधि( प्रदीप पाटील)                        महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनाने शैक्षणिक व सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून आपण उत्कृष्ट मार्गदर्शकाला मुकलो असल्याची भावना. आज येथे अनेक वक्त्यांनी व्यक्त केली.         येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयात, ग्रामीण विकास शिक्षण संस्था व स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील पतसंस्था यांच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांनी शब्द  सुमनांजली अर्पण केली.            ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक प्राचार्य डॉ. आर. ए. कुंभार म्हणाले, काकांनी शैक्षणिक क्षेत्रात महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटलांचा वारसा जोपासला. शिक्षकांना चांगले वक्ते ऐकायला मिळावेत यासाठी राष्ट्रीय नेत्यांपास...

विकास पर्व अर्बन निधी बँक चे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.

Image
  विकास पर्व अर्बन निधी बँक चे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. कराड - प्रतिनिधि,  विकास पर्व अर्बन निधी बँकेचे माध्यमातून लोकांना चांगली व पारदर्शक सेवा देण्यासाठी या संस्थेची स्थापना केली असल्याचे मत संस्थेच्या चेअरमन सौ उषा वाघमारे यांनी व्यक्त केले. त्या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कराड दक्षिण चे उपाध्यक्ष राहुल भोसले होते. यावेळी माथाडी कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय निकम, आर के मरिन करिअर अकॅडमी चे राहुल कुमार खांडके एस पी बिल्डर्स चे सुहास जगताप, जयवंत घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.  या वेळी बोलताना वाघमारे म्हणाल्या की सर्व सामान्यांना या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनांची माहिती देण्यात येईल व त्वरित व पारदर्शक सेवा देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहु. या संस्थेचे व्हा. चेअरमन अमोल कणसे संचालक महेंद्र गवळी, महेंद्र थोरात, उमेश साळुंखे, चंद्रकांत जगताप, पंकज पवार, विश्वजीत जाधव,  व संस्थेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

उंडाळे परिसरामध्ये बिबट्याचा वावर, प्रशासनाने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांकडुन मागणी.

Image
  उंडाळे परिसरामध्ये बिबट्याचा वावर, प्रशासनाने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांकडुन मागणी. उंडाळे, प्रतिनिधी,    उंडाळे -ओंड परिसरातील पांदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना बिबट्याचा वावर आढळून येत आहे.  परिसरात गत काहि दिवसापासुन ओंड, उंडाळे, शेवाळवाडी परिसरात सतत बिबट्याचा वावर  आढळल्याने गावांसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले.     उंडाळे  गावठाणालगत मुख्य रस्त्यावर जगदिश चाळके यांचे शेत व गुराचे शेड आहे. शेतीतील कामे व जनावराच्या शेडमधिल कामे उरकुन येत असताना शुक्रवारी रात्री ८ वाजता बाबासो मोहिते यांच्या शेड नजिकच्या मेन रस्त्यावर बिबट्या बसला होता असे जगदिश चाळके यांनी सांगितले दुचाकी लाईट पडताच शेजारील ऊस शेतामध्ये झेपावला.  दिवसेंदिवस उंडाळे व परिसरात बिबट्या व बछड्या वावर वाढल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मध्ये भितीचे वातावरण तयार झाले असुन संबंधित वनविभागाने त्यांच्याकडे लक्ष देऊन योग्य तो बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांना मधुन होत आहे.

आधुनिक डिजिटल शिक्षण ,झेप नव्या दशकाची.....!!!

Image
  आधुनिक डिजिटल शिक्षण ,झेप नव्या दशकाची.....!!! ब्यूरो रीपोर्ट -प्रदिप कुंभार..             * सध्या जर पाहिलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे.एकविसावे शतक येऊन वीस वर्षे झाली आहेत.आपण आता एका नवीन दशकामध्ये प्रवेश करीत आहोत.शैक्षणीक क्षेत्रात क्रांतिकारी बदल होऊन नवचैतन्य निर्माण झाले आहे.आधुनिक शैक्षणिक शोध लागले असून शैक्षणिक जीवनमान गतिमान झाले आहे.डिजिटल क्रांतीमुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाक्रांती घडून आली आहे.आधुनिकतेला तंत्रज्ञानाची जोड दिल्याने शिक्षण क्षेत्र दैदीप्यमान झाले आहे.*              *आधुनिक डिजिटल शिक्षण* ही काळाची गरज आहे. सध्याच्या काळामध्ये आपण पाहिले असता आधुनिक डिजिटल शिक्षण पद्धतीचा वापर केला जात आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहे.जुन्या शिक्षण पद्धती पेक्षा सध्याच्या शिक्षण पद्धती मध्ये आधुनिकतेचा वापर केलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये जुन्या रुढी, परंपरा नुसार शिक्षण दिलं जात होते, परंतु अलीकडच्या काळामध्ये आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक श...

कामथी ता. कराड. गावची 2020-21 ची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध.

Image
  कामथी ता. कराड. गावची 2020-21 ची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध. उंडाळे-  प्रतिनिधी  कामथी ता. कराड. जि. सातारा. गावची 2020-21 ची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असून सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे कराड उत्तरचे आमदार माननीय श्री बाळासाहेब पाटील यांनी व कराड दक्षिण चे आमदार महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या    होऊ घातलेल्या  महाराष्ट्र राज्यातील  ग्रामपंचायतींच्या निवडणूक लागल्या असून बऱ्याच्यास  ग्रामपंचायतींनी गाव गाडा चालवण्यासाठी व गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन ग्रामपंचायती च्या निवडणूका बिनविरोध करण्याचे ठरवले आहे त्यातच कराड तालुक्यातील शेवटचे गाव कामथी या गावातील ग्रामस्थांनीही आपली ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे ठरवले त्याला गावातील नागरिकांनी तसेच गावातील स्थानिक नेत्यांनी पाठिंबा दर्शवला व कामथी ग्रामपंचायत बिनविरोध झाली  त्यामुळे कराड येथे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री बाळासाहेब पाटील यांनी व माजी मुख्...

प्रत्येक गावामधुन निर्भीड,प्रामाणिक व तरुण नेतृत्व पुढे आले तर सर्वांगिण विकास शक्य.

Image
  प्रत्येक गावामधुन निर्भीड,प्रामाणिक व तरुण नेतृत्व पुढे आले तर सर्वांगिण विकास शक्य. ब्यूरो रीपोर्ट - प्रदिप पाटील. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे सुरू आहे. आपल्या गावाचा कारभार सुरळीत चालवून गाव पातळीवरच गावाचा विकास करुन घ्यायचा हा ग्रामपंचायत चा मुख्य उद्देश असतो. निवडणूक कोणतीही म्हणली तर त्यामध्ये लढत आणि जय पराजय होतच असतो. परंतु ग्रामपंचायत निवडणूक समजून घेणे गरजेचे आहे कारण एक निवडणूक आपल्या गावाचे रंग रुप सर्व काही बदल घडवू शकते. ग्रामपंचायत ही गावची संसद असते आणि म्हणून या संसदेच्या माध्यमातून आपल्या गावात कायदा सुव्यवस्था कायम ठेऊन गावचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे असते. म्हणून या गावच्या संसदेमध्ये गावातील तरुणांनी सहभागी होणे अत्यंत गरजेचे असते. गावातील ग्रामपंचायत म्हणजे गावासाठी सर्वोच्च असते असते. गावातील शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, यासोबतच गावात वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून तरूणांचे कौशल्य विकास, ग्राम विकासावर भर देऊन ग्रामपंचायचे काम गावाचे नाव नौकलोकिक करण्याची संधी म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक होय. आपण बघतोय बऱ्याच गावातील ग्रामपंचायत विशिष्ट लोकांच्या...