पाचवडफाटा येथे सेवा रस्त्यावर नाल्याचे सांडपाणी.
पाचवडफाटा येथे सेवा रस्त्यावर नाल्याचे सांडपाणी.
दि. 25: पाचवडफाटा, ता. कराड येथील महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून नाल्याचे सांडपाणी साचून राहिले आहे. याच पाण्यातून वाहनधारक ये-जा करत आहेत. याकडे रस्ते विकास महामंडळचे दुर्लक्ष होत असून हे रस्ते विकास महामंडळ फक्त नावालाच आहे का? असा सवाल वाहनधारक व नागरिक व्यक्त करत आहेत.कित्येक दिवसांपासून पाचवड फाटा येथे सेवा रस्त्यावर नाल्याचे पाणी येत असून सदरच्या रस्त्यावर ते साचून राहत आहे. अशीच परिस्थिती सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. सेवा रस्त्याचे काम करताना नाल्याचे व्यवस्थापन व सांडपाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने काम होणे गरजेचे होते. परंतु त्या कामात त्रुटी राहिल्यामुळे ही परिस्थिती सध्या निर्माण झाल्याची चर्चा नागरिक करत आहेत. या सेवा रस्त्यावरुन ये-जा करताना वाहनधारकांना त्रासाचे होत आहे. त्यामुळे या साचून राहिलेल्या पाण्यासंदर्भात कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याकडे रस्ते विकास महामंडळाने गांभीर्याने पाहण्याची गरजेचे आहे.

Comments
Post a Comment