कामथी ता. कराड. गावची 2020-21 ची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध.

 

कामथी ता. कराड. गावची 2020-21 ची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध.


उंडाळे-  प्रतिनिधी

 कामथी ता. कराड. जि. सातारा. गावची 2020-21 ची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असून सर्व स्तरातून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे कराड उत्तरचे आमदार माननीय श्री बाळासाहेब पाटील यांनी व कराड दक्षिण चे आमदार महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 

  होऊ घातलेल्या  महाराष्ट्र राज्यातील  ग्रामपंचायतींच्या निवडणूक लागल्या असून बऱ्याच्यास  ग्रामपंचायतींनी गाव गाडा चालवण्यासाठी व गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन ग्रामपंचायती च्या निवडणूका बिनविरोध करण्याचे ठरवले आहे त्यातच कराड तालुक्यातील शेवटचे गाव कामथी या गावातील ग्रामस्थांनीही आपली ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे ठरवले त्याला गावातील नागरिकांनी तसेच गावातील स्थानिक नेत्यांनी पाठिंबा दर्शवला व कामथी ग्रामपंचायत बिनविरोध झाली  त्यामुळे कराड येथे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री बाळासाहेब पाटील यांनी व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कामथी गावच्या ग्रामस्थांचे  अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या याप्रसंगी कामथी गावातील नवनिर्वाचित सदस्य श्री प्रकाश खंडागळे तानाजी खंडागळे. शिवाजी क्षीरसागर .श्रीमती मोरे. जगुताई दाभाडे .वैशाली मदने .जयप्रभा आतकरे .व कामथी गावचे नारायण खंडागळे. निवास खंडागळे .रामभाऊ खंडागळे .लक्ष्मण खंडागळे. शिवाजी खंडागळे. विजय अतकरे. विक्रम खंडागळे. सर्जेराव चव्हाण. नंदू आतकरे. जालिंदर माने. अधिक खंडागळे .विकास दाभाडे. शहाजी खंडागळे. सचिन खंडागळे. विजय खंडागळे. आनंदा खंडागळे. शांताराम खंडागळे .जयवंत खंडागळे . अमोल खंडागळे हे ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .