संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 5 जानेवारी 2021 रोजी ग्रामपंचायत सोनवडे येथे तीव्र आंदोलन.
संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 5 जानेवारी 2021 रोजी ग्रामपंचायत सोनवडे येथे तीव्र आंदोलन.
शिराळा - प्रतिनिधि,
सोनवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली याठिकाणी विशेष घटक योजनेचा झालेला गैरकारभार प्रकरणी आंदोलनाच्या संदर्भात चर्चा करताना व आंदोलनाची तयारी करताना कार्यकर्ते. विशेष घटक योजनेचा गैरवापर करून प्रस्ताव रद्द केल्याप्रकरणी संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 5 जानेवारी 2021.रोजी ग्रामपंचायत सोनवडे येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून त्या आंदोलनाची पूर्वतयारी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष डॉ. संदिप कांबळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काहीही झालं तरी हे आंदोलन आम्ही यशस्वी करू व दलित समाजावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडू व रद्द झालेले प्रस्ताव मंजूर करू अशी ग्वाही देतो संस्थापक अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांच्या समोर आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदेव कांबळे ,प्रकाश लोखंडे ,विजय कांबळे, शंकर कांबळे, यशवंत कांबळे, बाळासाहेब कांबळे , रिपब्लिकन पाटी ऑफ ईडिया पक्षाचे नेते माजी तालुका पंचायत उमेदवार पांडुरंग कृष्णा नांगरे .संविधान प्रतिष्ठान संघटना महाराष्ट्र सांगली जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदेव कांबळे, रीपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, बैरूतात्या बनसोडे .शरद कांबळे , बुधाजी कांबळे सोनवडे गावचे माजी सरपंच, सुधीर बाबर, पांडुरंग बाबर ,आदी मान्यवर उपस्थित होते

Comments
Post a Comment