मोरणा विभागात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज.
मोरणा विभागात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी देसाई-पाटणकर गट सज्ज.
मोरगिरी /किशोर गुरव
पाटण तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका अन सुरु असलेली रणधुमाळी यामुळे चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे.तर देसाई गटाचा असलेला बालेकिल्ला तालुक्यातील मोरणा विभाग या विभागात देसाई-पाटणकर गट सज्ज झाले आहेत. मात्र तत्पूर्वीच आटोली व आंबेघर तर्फ मरळी या दोन ग्रामपंचायती ना.शंभूराज देसाई गटाच्या बिनविरोध लागल्या आहेत तर गोकुळ तर्फ पाटण,वाडीकोतावडे,धावडे,कोकिसरे,काहीर,पेठ्शिवापूर,डोंगळेवाडी व पाचगणी या ग्रामपंचायतिच्या निवडणुका लागल्या आहेत.मोरणा वीभागतील एकूण दहा ग्रामपंचायत निवडणुका असून त्या पैकी आटोली व आंबेघर तर्फ मरळी या दोन ग्रामपंचायती देसाई गटाच्या बिनविरोध झाल्या असून देसाई गटाच्याच विचाराच्या असणर्या धावडे व पाचगणी या दोन ग्रामपंचायतीनची अंशतः निवडणूक लागली आहे.तर काहीर व डोंगळेवाडी या दोन ग्रामपंचायतीत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाचे वर्च्वास दिसून येत आहे.तर गोकुळ तर्फ पाटण,वाडीकोतावडे, कोकिसरे पेठ्शिवापूर या चार ग्रामपंचायतीत देसाई गट व पाटणकर गट यांच्यात जोरदार लढत होईल.यामध्ये गोकुळ तर्फ पाटण ग्रापंचायत गत पंचवार्षिकला देसाई गटाकडून पाटणकर गटाने सत्ता काबीज केली होती. त्यामुळे या वेळेला किसान गालवे (नाना ) यांची प्रतिष्ठा चांगलीच पणाला लागली आहे.वाडीकोतावडे ग्रामपंचायती मध्ये माजी सरपंच तुकाराम सुर्वे हे देसाई गटाचीच सत्ता अबाधित राखतील अशी शक्यता दिसून येत आहे.तर माजी पंचायत समिती सदस्य नथुराम कुंभार (सर) यांनी कोकिसरे ग्रामपंचायत निवडणुकीत आखलेले मास्टर प्लेनिंग या पुढे विरोधक किती तग धरणार हे येणारा काळच सांगून जाईल तर पेठ्शिवापूर ग्रामपंचायत निवडणुकीत देसाई गट व पाटणकर गट या दोन्ही गटातहि बंडखोरी झाले असले मुळे निवडणुकीत चांगलीच रंगत येणार हे निश्चित मात्र देसाई गटाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू तर पाटणकर गटाकडून संजय हिरवे व लखन मोरे यांची कोणती राजकीय खेळी आखणार हे येणाऱ्या काळात दिसून येईल एकंदरीत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोरणा विभागात देसाई गट व पाटणकर गट यांच्यात जोरदार चुरस लागणार हे निश्चित.

Comments
Post a Comment