प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने ढेबेवाडी येथे वृक्षारोपण लावून पत्रकार दिन साजरा

 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने  ढेबेवाडी येथे वृक्षारोपण लावून पत्रकार दिन साजरा.


ढेबेवाडी - प्रतिनिधि,

ग्रामीण भागातील विधायक कामांना जगासमोर आणून त्या कामांना पाठबळ देण्याचे काम पत्रकार करत आहेत.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करताना. कोणतीही अपेक्षा न ठेवता पत्रकार काम करत असतात त्यामुळे समाजासाठी कायम काम करणाऱ्या पत्रकारांना पाठबळ देणे गरजेचे आहे. असे मत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने ठेण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृह मध्ये पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात ढेबेवाडी वनपाल सुभाषराव राऊत  यांनी मत व्यक्त केले.

पत्रकार दिनानिमित्त ढेबेवाडी ता.पाटण येथे वृक्षारोपण करून पत्रकार दिन साजरा केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील,सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र पानवळ, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष सागर पाटील,प्रहार अपंग क्रांती पाटण तालुका अध्यक्ष विद्या कारंडे,वनपाल डी.डी.बोडके,पत्रकार नितीन खरात,सामाजिक कार्यकर्ते जयवंतराव पाटील,अजय कुंभार, रशिकांत होलमुखे,अनिकेत पाटील,व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .