पडघम निवडणुकीचे, प्रचारात सोशल मिडिया आघाडीवर.
पडघम निवडणुकीचे, प्रचारात सोशल मिडिया आघाडीवर.
उंडाळे - प्रतिनिधि (प्रदिप पाटील,)
कराड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या प्रचारात चांगलाच जोर धरू लागल्यामुळे विविध पक्षाचे नेते, गाव पुढारी, पार्टी अध्यक्ष व कार्यकर्ते सध्या निवडणुक प्रचारात आधुनिकतेची झालर पकडत सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
कराड दक्षिणच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांचा जोर वाढत असून, उमेदवारांची प्रचार यंत्रणा सुरू झाली आहे. यामध्ये सध्या सोशल मीडियावर प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसत आहेत. वॉर्ड बैठका, गाव बैठका, घरोघरी व चौकाचौकांत रणनीतीसाठी उमेदवार व कार्यकर्त्यांच्या बैठकांच्या फैरी सुरू आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारदस्त मिक्सिंग केलेले व्हिडिओ ऑडिओ उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांच्या जुन्या प्रचार यंत्रणेत दिवसेंदिवस बदल होत आहे.
हजार-पाचशेच्या नादी लागू नका. आता नाहीतर, पुन्हा नाही. आपला माणूस हक्काचा माणूस, इतिहास वाचायला नाहीतर रचायला आलोय, कोरोनात गावबंदी करणारे आता गावाला या म्हणून आग्रह करतील. उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. यंदा डोअर टू डोअर प्रचाराच्या फेरीआधी सोशल मीडियावर दणदणीत प्रचार सुरू आहे. अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ, ऑडिओ व मिक्सिंग चित्रांची रेलचेल सोशल मीडियावर दिसत आहे. काहींनी तर भावी सरपंच, मेहरबान, असे पद लावून प्रचार तंत्र अवलंबत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजत अंतिम टप्पात आल्याने प्रचार यंत्रणेचा जोर वाढला आहे. अनेकांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून येते. विविध प्रकारच्या राजकीय पोस्ट शेअर करून वातावरण निर्मिती केली जात आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे.
सोशल मीडियावर कधी न चमकणारे आज प्रचाराच्या माध्यमातून चमकत असल्याचे दिसून येते, तर काही उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन प्रचार तंत्र सुरू केले आहे.

Comments
Post a Comment