कराड तालुक्यातील 200 ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर.

 

कराड तालुक्यातील 200 ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर.


कराड दि.29 (प्रतिनिधी) कराड तालुक्यातील 200 ग्रामपंचायतीसाठी आज कराडचे तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी येथिल यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात सरपंच आरक्षण जाहिर केले. ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण 25 सरपंचपपदे जाहिर करण्यात आली त्यामध्ये 13 महिलांसाठी तर 12  खुली आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गात 1 पद खुले आहे.नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 54 पदे जाहिर झाली असून त्यामध्ये 27 महिला तर 27 खुली आहेत. तालुक्यात सरपंचपदासाठी खुल्या प्रवर्गात 120 पदामध्ये 60  महिला तर 60 पदे खुली आहेत.

आज जाहिर झालेल्या सरपंच आरक्षण सोडतीमध्ये कराड तालुक्यातील सन 2020 ते 2025 पर्यंत सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करिता सरपंच आरक्षण आज जाहीर करण्यात आले यामध्ये गोडवाडी, अक्काईचीवाडी, नारायणवाडी, शितळवाडी, नांदलापूर, बाबरमाची, वसंतगड, चिंचणी, हणबरवाडी, वनवासमाची (स.गड), अंधारवाडी, सावरघर, नानेगाव, संजयनगर (शेरे), बेलदरे वनवासमाची (खोडशी), धावरवाडी, भवानवाडी, शिंगणवाडी, अंबवडे, मेरवेवाडी, कोयनावसाहत, शिंदेवाडी (विंग ), डेळेवाडी, वाण्याचीवाडी, करंजोशी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग करिता सरपंच आरक्षणामध्ये कार्वे, कापील, पाचुंदा, भोसलेवाडी, गोवारे, शामगाव, उत्तर कोपर्डे (यादववाडी), घोणशी, मालखेड, कालवडे, वडोली निळेश्वर, गोळेश्वर, बनवडी, कोळेवाडी, किवळ, इंदोली, शहापूर, हजारमाची, तुळसण, वस्ती साकुर्डी, काले, कोरिवळे, पश्चिम सुपने, संजयनगर (काले), दुशेरे , बाबरमाची पू.(डिचोली), शेवाळवाडी (उंडाळे).

याच मागास प्रवर्ग करिता महिलासाठी खोडजाईवाडी, चोरे ,पाचपुतेवाडी, यशवंनगर, अंतवडी, येणके, भुयाचीवाडी, शिवडे, सवादे, गोसावेवाडी, लोहारवाडी, भांबे, येवती, पार्ले, पेरले, साळशिरंबे, शेळकेवाडी (म्हासोली), गमेवाडी, कालेटेक, येणपे, साजुर, ओंड, हवेलवाडी, बानुगडेवाडी, उंडाळे, रिसवड, जुने कवठे या गावांचा समावेश आहे.


कराड तालूक्यातील सर्वसाधारण करीता सरपंच आरक्षणातील गावे पूढील प्रमाणे कोर्टी,उंब्रज, वाघेरी, पिंपरी , कोणेगाव, उत्तर तांबवे, कोपर्डे हवेली, कळंत्रेवाडी, तारूख, वहगाव, चिखली, महारुगडेवाडी, साबळवाडी, भरेवाडी, गोटेवाडी, कामथी, पोतले, जुळेवाडी ,शेवाळवाडी (म्हासोली), जिंती, आणे, बेलवाडी, चोरजवाडी, लटकेवाडी, शेळकेवाडी (येवती), कचरेवाडी, घोलपवाडी, खोडशी, बेलवडे बुद्रुक, जखिनवाडी, गोंदी, वडोली भिकेश्वर, चचेगाव, सुर्ली, रेठरे बुद्रुक, मनू, हेळगाव, गणेशवाडी, कालगांव, चौगुलेमळा (भैरवनाथ नगर), चरेगाव, पाडळी हेळगाव, बेलवडे हवेली, कासारशिरंबे, विठोबाचीवाडी, केसे, हिंगनोळे, वडगाव हवेली, धोंडेवाडी, जुजारवाडी, कोरेगाव , शेणोली, नांदगाव, सैदापूर, साकुर्डी, कुसुर, आरेवाडी,मस्करवाडी, धनकवाडी या गावांचा समावेश आहे.

तालूक्यातील महिलांसाठी सर्वसाधारण महिलांसाठी विजयनगर, कांबीरवाडी, कोळे, घारेवाडी, सूपने,भुरभुशी,रेठरे खुर्द, म्हासोली, वराडे, शेरे, तांबवे, गोटे, पवारवाडी, विरवडे, खुबी, मुंढे, नवीन कवठे, बामणवाडी, यादववाडी, घराळवाडी, टाळगाव, अबईचीवाडी, आटके, मुनावळे, हनुमानवाडी, हणमंतवाडी, गायकवाडवाडी, वानरवाडी, कोडोली, मसूर, तासवडे, शिरगाव, माळवाडी, घोगाव, किरपे, वारुंजी, म्होप्रे,निगडी ,खराडे ,टेंभू,पाल, वडगाव उंब्रज, खालकरवाडी, वाघेश्वर,भोळेवाडी, ओंडोशी, मांगवाडी, सयापुर, नडशी, हरपळवाडी, राजमाची, येळगाव, तळबीड, मरळी, वाठार, पाडळी (केसे), करवडी, येरवळे, विंग, आदर्शनगर या गावांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .