कराड तालुक्यातील सुमारे 85 प्रकरणातून महसूल विभागाला 4 कोटी 55 लाख 7 हजार 360 रुपये येणे बाकी असल्याने संबंधितांना नोटिसा बजावल्या.
कराड तालुक्यातील सुमारे 85 प्रकरणातून महसूल विभागाला 4 कोटी 55 लाख 7 हजार 360 रुपये येणे बाकी असल्याने संबंधितांना नोटिसा बजावल्या.
कराड : गौण खनिज संबंधाने कराड तालुक्यातील सुमारे 85 प्रकरणातून महसूल विभागाला 4 कोटी 55 लाख 7 हजार 360 रुपये येणे बाकी असल्याने संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान 21 मिळकतधारकांच्या जमिनी सरकार जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. तर 14 मिळकतधारकांच्या जमिनीवर असणारा सरकारी बोजा पैसे भरल्यामुळे कमी करण्यात आला आहे. 50 जणांना सरकारी बोजा नोंद करण्याबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून यामुळे लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे अशी माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली.
कराड तालुक्यातील गौण खनिज प्रकरणी म्हणजेच वाळू, मुरूम, माती अवैधरित्या उत्खनन केल्याप्रकरणी 85 जणांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बहुतांश करून वाळू उत्खनन व वाळू साठा अवैधरित्या अनेकांनी केला असल्यामुळे सदरची कारवाई 1997 पासून करण्यात आलेली प्रकरणे प्रलंबित आहेत. या अनुषंगाने महसूल विभागाने दंडात्मक केलेली कारवाईची रक्कम वसूल करण्याच्या अनुषंगाने नोटिसा बजावूनही त्याला प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासकीय पातळीवरील असणारे कार्यवाहीस प्रारंभ केला आहे. ज्या व्यक्तींवर सदरची कारवाई करण्यात आलेली आहे, अशा संबंधितांच्या जमिनीवर सरकारचे नाव नोंदविण्याचे काम महसूल विभागाने हाती घेतली आहे.
ज्या 21 व्यक्तींच्या जमिनीवर "सरकार" असे नाव लावण्यात येणार आहे. अशा व्यक्तींची नाव, गाव व रक्कम खालील प्रमाणे. किरण बाबासो पाटील (येरवळे), 8 लाख 49 हजार. विक्रम महादेव शिंदे (ओंड), 21 लाख 78 हजार 450. अधिक आनंदा सावंत (ओंडोशी) 31 लाख 33 हजार 97. शंकरराव रामचंद्र थोरात (कार्वे) 3 लाख 12 हजार 812. संदीप ज्योतीराम बोराटे,(विलवडे), 2 लाख 20 हजार 875. दत्तात्रय किसन माने (मालखेड) 2 लाख 61 हजार 562. संग्राम महेश थोरात (शिरवडे) 2 लाख 61 हजार 562. निवास बाबासो थोरात (शिरवडे) 86 हजार 687. निलेश बाबुराव जगदाळे शिरोडे 15 हजार. विठ्ठल पांडुरंग जगदाळे (मयत) वारस सुनील विठ्ठल जगदाळे (शिरवाडे), 15 हजार. दादासो जगन्नाथ डुबल (शिरवडे) 48 हजार 437. आनंदा हरी थोरात,आण्णासो आनंदा थोरात (शिरवडे) 15 हजार. प्रमोदसिंह हिंदुराव जगदाळे, हिंदुराव अंतु जगदाळे (शिरवडे), 1 लाख 43 हजार 375. हणमंत गणपती जगदाळे (शिरवडे), 6 लाख 23 हजार 837. प्रवीण भाऊसाहेब पिसाळ (नडशी), 5 लाख 8 हजार 5. रामचंद्र उर्फ चंद्रकांत दादा थोरात (नडशी). 2 लाख 78 हजार 875. रवींद्र सुभाष थोरात (नडशी), 56 हजार 250. संजय बाळकृष्ण थोरवडे (वारुंजी), 17 लाख 62 हजार 500. रामचंद्र पंढरीनाथ खालकर (मयत) वारस सुवर्णा रामचंद्र खालकर (खालकरवाडी) 26 लाख 67 हजार. विनायक बाळाराम पवार (बामणवाडी) 33 हजार 591. उत्तम हिंदुराव देसाई (बामणवाडी) 1 लाख 78 हजार 43.
या 21 जणांकडून 1 कोटी 46 लाख 66 हजार 275 रुपये दंडात्मक दृष्ट्या आकारण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत महसूल विभागाने त्यांना दोन नोटिसा पाठवूनही प्रतिसाद न दिल्यामुळे सदर व्यक्तींच्या जमिनीवर "सरकार" अशी नोंद करण्याची कार्यवाही महसूल विभागाने हाती घेतली आहे. संबंधित व्यक्तीनी महसूल विभागाच्या गौणखनिज अंतर्गत येणारे वाळू, माती, मुरुम अवैधरीत्या उत्खनन केले व साठा केल्याप्रकरणी महसूल विभागाच्यावतीने तत्कालीन कालावधीत दंडात्मक कारवाई करून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
दरम्यान कराड तालुक्यातील 14 जणांच्यावर शासकीय आदेशाने जमिनीवर बोजा नोंद केला होता. दंडात्मक आकारण्यात आलेली रक्कम संबंधित व्यक्तीनी भरल्यामुळे त्यांच्या जमिनीवरील सरकारी बोजा कमी करण्यात आला आहे.
दंडात्मक रक्कम भरलेली व्यक्ती,गाव, वसूल झालेली रक्कम पुढीलप्रमाणे. लालासो उर्फ विनायक शंकर यादव (पोतले) 75 हजार. सुनील गोविंद यादव (कोर्टी) 17 हजार 500. बाळासो पोपट जाधव (तासवडे) 96 हजार 100. युवराज भार्गव जाधव (तासवड) 79 हजार 200. संदीप जालिंदर पाटील (बेलवडे हवेली), 54 हजार 150. सुरेश उर्फ सुभाष बाबुराव पाटील (वाठार), 50 हजार. राहुल प्रताप्राव मोहिते (रेठरे बुद्रुक), 49 हजार 100. संजय आनंदराव जाधव (तासवडे) 39 हजार 600. लक्ष्मण रामचंद्र पवार (शहापूर), 35 हजार 650. प्रमोद वसंतराव मोहिते (रेठरे बुद्रुक), 23हजार 900. दादा विष्णू जगदाळे, गणेश दादा जगदाळे (तासवडे) 19 हजार 800. राजू आकाराम मोरे (कोडोली) 11 हजार 840. संभाजी शंकर जगताप (कोडोली) 9 हजार 444. अधिकराव श्रीरंग पाटील (कोडोली) 4 हजार 752.
या 14 व्यक्तीनी 7 लाख 23 हजार 536 रुपये महसूल विभागाने दंडात्मक आकारलेली रक्कम शासनाच्या खजिन्यात भरल्यामुळे त्यांच्या जमिनीवर "सरकार" नोंद असलेला बोजा कमी करण्यात आला आहे.

Comments
Post a Comment