उंडाळे परिसरामध्ये बिबट्याचा वावर, प्रशासनाने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांकडुन मागणी.
उंडाळे परिसरामध्ये बिबट्याचा वावर, प्रशासनाने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांकडुन मागणी.
उंडाळे, प्रतिनिधी,
उंडाळे -ओंड परिसरातील पांदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना बिबट्याचा वावर आढळून येत आहे. परिसरात गत काहि दिवसापासुन ओंड, उंडाळे, शेवाळवाडी परिसरात सतत बिबट्याचा वावर आढळल्याने गावांसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
उंडाळे गावठाणालगत मुख्य रस्त्यावर जगदिश चाळके यांचे शेत व गुराचे शेड आहे. शेतीतील कामे व जनावराच्या शेडमधिल कामे उरकुन येत असताना शुक्रवारी रात्री ८ वाजता बाबासो मोहिते यांच्या शेड नजिकच्या मेन रस्त्यावर बिबट्या बसला होता असे जगदिश चाळके यांनी सांगितले दुचाकी लाईट पडताच शेजारील ऊस शेतामध्ये झेपावला.
दिवसेंदिवस उंडाळे व परिसरात बिबट्या व बछड्या वावर वाढल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मध्ये भितीचे वातावरण तयार झाले असुन संबंधित वनविभागाने त्यांच्याकडे लक्ष देऊन योग्य तो बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांना मधुन होत आहे.

Comments
Post a Comment