कराड तालुक्यातील संजयनगर-शेरे ग्रामपंचायतीची पहिलीच निवडणूक बिनविरोध.
कराड तालुक्यातील संजयनगर-शेरे ग्रामपंचायतीची पहिलीच निवडणूक बिनविरोध.
कराड तालुक्यातील संजयनगर-शेरे ग्रामपंचायतीची नुकतीच स्थापन झाली.स्थापने नंतरची पहिलीच निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये ग्रामस्थांना यश आले आहे.कृष्णेचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले व कराड पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब निकम यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले.या कामी शेरेचे माजी सरपंच मोहनराव निकम व उद्योजक डी.आर.चव्हाण यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली. निकम व चव्हाण यांनी राजकीय कसब पणाला लावून बिनविरोध निवड प्रक्रिया पूर्ण केली.सोमवारी अर्ज माघारीनंतर बिनविरोधचे चित्र स्पष्ट झाले.
श्री क्षेत्र चौरंगीनाथ डोंगर पायथ्याशी संजयनगर वसाहत आहे.महसुली गावाचा दर्जा असूनही स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्याने विकासाची प्रक्रिया राबवताना अडथळे यायचे.भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल, याची चाहूल लागताच ग्रामस्थांनी गत दोन वर्षां पासून स्वतंत्र ग्रामपंचायती साठी प्रयत्न सुरु केले.शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गतवर्षी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली.सध्या प्रशासकांच्या अधिपत्याखाली कामकाज सुरु होते.
कोरोना मध्ये स्थगित झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होताच संजयनगर मध्ये प्रथमतः निवडणुकीचे पडघम वाजले.पण ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोहनराव निकम व डी. आर. चव्हाण यांनी पुढाकार घेतला.श्री. भोसले यांना बिनविरोध निवडणुकीचे महत्व त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर श्री.भोसले यांनीही याकामी सहकार्य केले.सोमवारी अर्ज माघारी नंतर बिनविरोध निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले.यानंतर ग्रामस्थांनी गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.पोपट मदने , कविता शिंगाडे , मनीषा सातपुते , सर्जेराव मदने, अशोक आडके, शोभा मस्के, अंजली जाधव, सतीश चव्हाण, कमल पवार यांची बिनविरोध झाली.

Comments
Post a Comment