आधुनिक डिजिटल शिक्षण ,झेप नव्या दशकाची.....!!!
आधुनिक डिजिटल शिक्षण ,झेप नव्या दशकाची.....!!!
ब्यूरो रीपोर्ट -प्रदिप कुंभार..
*सध्या जर पाहिलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे.एकविसावे शतक येऊन वीस वर्षे झाली आहेत.आपण आता एका नवीन दशकामध्ये प्रवेश करीत आहोत.शैक्षणीक क्षेत्रात क्रांतिकारी बदल होऊन नवचैतन्य निर्माण झाले आहे.आधुनिक शैक्षणिक शोध लागले असून शैक्षणिक जीवनमान गतिमान झाले आहे.डिजिटल क्रांतीमुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये महाक्रांती घडून आली आहे.आधुनिकतेला तंत्रज्ञानाची जोड दिल्याने शिक्षण क्षेत्र दैदीप्यमान झाले आहे.*
*आधुनिक डिजिटल शिक्षण* ही काळाची गरज आहे. सध्याच्या काळामध्ये आपण पाहिले असता आधुनिक डिजिटल शिक्षण पद्धतीचा वापर केला जात आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहे.जुन्या शिक्षण पद्धती पेक्षा सध्याच्या शिक्षण पद्धती मध्ये आधुनिकतेचा वापर केलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये जुन्या रुढी, परंपरा नुसार शिक्षण दिलं जात होते, परंतु अलीकडच्या काळामध्ये आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक शिक्षण दिले जात आहे आणि भविष्यामध्ये अजूनही आधुनिक बदल होणार आहे .अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अध्यापनामध्ये सध्या प्रभावी वापर केला जातो आहे. पूर्वी फक्त खडू-फळा मध्ये मर्यादित राहणारे शिक्षण होते पण आलिकडच्या काळामध्ये शिक्षण हे स्मार्ट अँड्रॉइड स्क्रीनवर दिलं जातं . आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असून अत्याधुनिक तंत्रज्ञान हे अध्यापनामध्ये वापरलं जात आहे .त्याच्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांची आंतरक्रिया चांगल्या पद्धतीने होत असून विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये भाग घेत आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं हे अतूट बनलं आहे.
*शैक्षणिक ॲप्स* आपण प्ले स्टोअर तसेच गुगल वर जर पाहिलं तर हजारो शैक्षणिक ॲप्स आपणाला दिसून येतील. या शैक्षणिक ॲप्स चा वापर करून आधुनिक शिक्षण सध्या दिले जात आहे. दररोज नवीन अँप्स आपणास उपलब्ध होत आहेत. शैक्षणिक ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शिक्षण हे सहज व सोपे केले जात आहे. शिक्षण हे स्मार्ट बनले असून काही नवीन पद्धतीचे शिक्षण ही आपणास दिवसेंदिवस उपलब्ध होत आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून हसत-खेळत मोबाईल वर शिक्षण घेतला जात आहे. शैक्षणिक अँप्स मुळे आधुनिक डिजिटल शिक्षण मोबाईल वर सहजरित्या उपलब्ध झाले आहे.
*अष्टपैलू मोबाईल* मधून आधुनिक शिक्षण अलीकडे दिलं जातं आहे. मोबाईलचा वापर प्रचंड वाढलेला आहे. त्याच्यामध्ये अँड्रॉइड फोन्सची प्रगती खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली आहे. अँड्रॉइड फोनच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर या फोनच्या माध्यमातून आपण काहीही करू शकतो.सर्व शैक्षणिक बाबी मोबाईल वर शक्य झाल्या आहेत.विद्यार्थी या अँड्रॉइड फोनचा वापर शैक्षणिक कारणास्तव मोठ्या प्रमाणावर करत आहेत. विविध ॲप्लिकेशन,शैक्षणिक वेबसाईट, स्वाध्याय, व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी मोबाईलचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये करून आधुनिक शिक्षण दिले जात आहे. आपण जर सध्याचा कोविड काळ जर बघितला तर शाळा बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे . ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणासाठी मोबाइलचा सर्वाधिक वापर केला जात आहे. प्रत्यक्ष शाळा बंद असल्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून विविध ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, विविध वेबसाईटच्या माध्यमातून मोबाईलच्या द्वारे शिक्षण सुरूच ठेवलं गेलं आहे आणि या ऑनलाईन शिक्षणामध्ये मोबाईलचा वापर सर्वाधिक केला जात आहे.
*नवोपक्रम व कृतिसंशोधन* शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. शिक्षक स्वतःहून पुढे येऊन अनेक विषयावर नाविन्यपूर्ण नवोपक्रम सादर करत आहेत. नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये राबवून त्याचा फायदा विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी केला जात आहे. काही विषयांच्या काही शैक्षणिक समस्यांच्या बाबतीत कृती संशोधन केले जात आहे. ज्या विषयाच्या बाबतीत किंवा जी समस्या जाणवत आहे.त्याच्या संदर्भात कृती संशोधन देखील केले जात आहे. अलीकडच्या काळामध्ये या कृती संशोधनाचा व नवोपक्रमांचा वापर हा भविष्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जाणार आहे. त्यामुळे शाळा या आनंदायी शाळा होत आहेत आणि शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी या शैक्षणिक संशोधनाचा वापर केला जात आहे.
*ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण* सध्याचा कोरोना प्रभाव पाहता शाळा बंद आहेत, तरीही शिक्षण चालू ठेवण्या करता विविध पर्यायांचा वापर केला जात आहे .याच्या मध्ये काही ऑनलाईन पर्याय तर काही ऑफलाईन पर्याय शिक्षणाच्या बाबतीत वापरले जात आहेत. ऑनलाईन च्या बाबतीत जर पाहिलं तर व्हिडीओ कॉन्फरन्स असेल ,ऑनलाइन टेस्ट असतील, ऑनलाईन वेबिनार याच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. त्याच पद्धतीने ऑफलाइन शिक्षणामध्ये देखील काही डिजिटल साहित्य,स्वाध्याय पुस्तिका,कृतीपत्रिका तयार करून ते विद्यार्थ्यांना घरोघरी ऑफलाइन प्रिंट पुरवून त्याच्या माध्यमातून देखील शिक्षण दिले जात आहे. याच्या मध्ये कृतीपत्रिका,शैक्षणिक पीडीएफ,यांचा वापर करून ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण दिले जात आहे.ही शिक्षकांच्या कौतुकाची बाब आहे.
अलीकडच्या काळामध्ये *शिक्षणाचे बदलते प्रवाह* सुरू झालेले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण पूर्वीच्या काळचे शिक्षण आणि सध्याचे शिक्षण याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे .पूर्वी खडू-फळा या माध्यमातून दिले जाणारे शिक्षण हे सध्या डिजिटल माध्यमांच्या टच बोर्ड, संगणक,प्रोजेक्टर, अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही यांच्या माध्यमातून दिले जात आहे. पारंपारिक शिक्षणाच्या पद्धतीसोबतच अपारंपारिक शिक्षण पद्धती देखील वापरली जात आहे. त्यामुळे शिक्षणाचे ही बदलते स्वरूप विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी आंतरक्रिया करते व त्याच्यातून शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विद्यार्थी विकास होत आहे.
*शिक्षणाचे आधुनिक स्त्रोत* निर्माण झालेली आहेत. शिक्षणाच्या विविध पद्धती निर्माण झाल्यामुळे मार्ग भरपूर असल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर पर्याय देखील भरपूर उपलब्ध आहेत .त्यापैकी कोणता योग्य पर्याय निवडावा व शिक्षण घ्यावे हे विद्यार्थ्यांच्या समोर अनेक मार्ग उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण व योग्य निर्णय घेऊन शिक्षणाचा योग्य मार्ग निवडण्याचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. आपल्याला हवे तसे शिक्षण कोणत्या माध्यमातून घ्यायचे ,कोणत्या विषयाचे घ्यायचे, आपली आवड काय, निकड काय ,गरज काय, याचा विचार करून विद्यार्थी शिक्षण नाचे पर्याय निवडू शकतो. अलीकडच्या काळामध्ये शिक्षणाचे विविध कोर्सेस, डिप्लोमा, डिग्री उपलब्ध झाल्यामुळे योग्य तो पर्याय विद्यार्थी निवडू शकतात
अध्ययन-अध्यापन प्रक्रिया मध्ये *क्यू आर कोड* चा वापर केला जात आहे. पुस्तके Q R कोड ने संलग्न केली असल्यामुळे विद्यार्थी तो कोड स्कॅन करून त्याच्या मध्ये दिलेला कंटेंट ओपन करून तो घटक कधीही पाहून समजून घेऊ शकतो, आणि तो घटक शिकवत असताना काही अवघड संकल्पना असतील त्या त्या माध्यमातून सोप्या होऊ शकतात .विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकच पर्याय नाही तर विद्यार्थ्यांना त्यात किंवा QR कोड च्या माध्यमातून अनेक प्रकारचे ऑनलाइन ऑफलाइन कन्टेन्ट उपलब्ध झाल्यामुळे त्याच्याशी रिलेटेड घटक अधिक सविस्तर जाणतो, त्याची माहिती घेतो व तो QR आर कोड स्कॅन करून पाहू शकतो.
*ऑगमेंटेड रियालिटी व व्हर्च्युअल रियालिटी* चा वापर अध्यापनात केला जात आहे. त्यामुळे त्या घटकाचा ज्यादा वाढीव भाग, अतिरिक्त भाग विद्यार्थ्यांना चांगला समजतो. विद्यार्थी त्या भागाचा जास्त अभ्यास करू शकतात. कोणताही घटक ऑगमेंटेड रियालिटी मुळे तो घटक प्रत्यक्ष लहान-मोठा करून चारी बाजूने फिरवून त्याच्या लहान घटकांचा बारकाईने अभ्यास विद्यार्थी करू शकतात म्हणजे प्रत्यक्ष तो घटक पाहिल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना येतो व तो घटक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजू शकतो.
*डिजिटल शिक्षण* सध्याच्या काळामध्ये शाळेमध्ये डिजिटल माध्यमातून शिक्षण मोठ्या प्रमाणामध्ये दिले जात आहे.डिजिटल शिक्षण म्हणजे डिजिटल साधनांचा वापर करून जे शिक्षण दिलं जातं त्याला डिजिटल शिक्षण असे एकंदर म्हटले जाते. तर सर्व शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. अनेक प्रकारची डिजिटल अत्याधुनिक साधनांचा वापर शाळेमध्ये केला जात असून संगणक, प्रोजेक्टर, लॅपटॉप, मोबाईल, प्रिंटर, स्कॅनर, ब्लूटूथ, साउंड ,हेडफोन, इंटरॅक्टिव बोर्ड अशा प्रकारच्या साधनांचा वापर करून हे डिजिटल शिक्षण हे विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून शाळेमध्ये दिले जातो. या डिजिटल माध्यमांचा वापर करून दिले जाणारे शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात राहते. यामध्ये अनेक प्रकारच्या शैक्षणिक सॉफ्टवेअरचा,अप्लिकेशन चा वापर ,युट्युब चा वापर, गुगलचा वापर ,एकंदर इंटरनेटचा वापर करून दिलेले शिक्षण विद्यार्थी अवधान खेचून पाहतात. विद्यार्थ्यांच्या चांगलं लक्षात राहतं.फक्त पुस्तक घेऊन शिकवण्यापेक्षा पुस्तकासोबतच या डिजिटल साधनांचा वापर करून जर शिकवलं गेलं ही आधुनिक शिक्षण पद्धती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू शकते. याबाबतीत जिल्हा परिषदेच्या शाळांनी डिजिटल शिक्षणात गरुड भरारी घेतली आहे.डिजिटल शिक्षण हे नव्या दशकामध्ये सर्वोत्तम पर्याय आहे. परंतु विद्यार्थी विकासासाठी फक्त डिजिटल शिक्षणच उपयुक्त नाही तर पारंपारिक शिक्षणाला आधुनिक डिजिटल शिक्षणाची जोड देऊन शिक्षण देणे आवश्यक आहे.
*ई लर्निंग* ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण दिले जातं. विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून अनेक मार्ग उपलब्ध झालेले आहेत. ईलर्निंग मध्ये डिजिटल माध्यमांचा, साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाते. ई लर्निंग चा वापर केल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढत आहे. सध्याच्या काळामध्ये ई-लर्निंग चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याच्यामुळे विद्यार्थी शाळेसह घरी ही अध्ययन करू शकतात.
*कोरोना काळातील शिक्षण* सध्या आपण पाहतोय की कोरोनामुळे शाळा बंद आहेत .सर्व शिक्षण प्रत्यक्ष बंद आहे . तरीही शिक्षण मात्र सुरूच आहे .तरी शिक्षण सुरू ठेवण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल साधनांचा वापर केला जात आहे. भविष्यामध्ये देखील या साधनांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. शाळा बंद जरी असल्या तरी ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचे मार्ग उपलब्ध झालेले आहेत. याच्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्स,व्हाट्सअप ,फेसबुक, युट्युब, गुगल यांचा वापर करून दिलेले शिक्षण असेल, विविध वेबिनार असतील ,याच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं आहे. ऑनलाईन टेस्ट, ऑफलाईन टेस्ट, विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून तसेच झूम, गुगल मीट,स्काईप यासारख्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप्लिकेशनच्या माध्यमातून देखील शिक्षण या कोरोना काळामध्ये देखील दिले जात आहे. सध्याच्या काळामध्ये ही सर्व शैक्षणिक डिजिटल प्रगती झाल्यामुळेच सर्व शक्य आहे. भविष्यामध्ये अजूनही नवीन डिजिटल शोध लागून याच्यामध्ये सुधारणा होऊ लागल्या आहेत. डिजिटल शिक्षणामध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी माध्यमातून शिक्षण दिले जाते. या शिक्षणामुळे या तंत्रज्ञानामुळे कोणीही कुठूनही शिकू शकतो. विद्यार्थी घरात देखील अतिरिक्त शिकू शकतात. मात्र या तंत्रज्ञानाला काही मर्यादा देखील आहेत हे स्पष्ट झालेले आहे .त्यामुळे प्रत्यक्ष शाळेतील शिक्षण गरजेचं आहेच, त्यासोबत पर्याय म्हणून ऑनलाइन शिक्षण देखील उपयुक्त आहे असे दिसून येते.या ऑनलाईन शिक्षणाला तंत्रस्नेही शिक्षकानीं हातभार लावला आहे.
सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये *अत्याधुनिक साधनांचा वापर* केला जात आहे. अत्याधुनिक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन ,ऑफलाइन, डिजिटल ई-लर्निंग दिले जात आहे. याच्यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर ,टच स्क्रीन, एलसीडी, टच बोर्ड यांचा वापर करून शिक्षण दिले जात आहे. त्याच पद्धतीने विविध प्रकारच्या पीडीएफ, स्मार्ट पीडीएफ,ऑनलाइन टेस्ट या सर्व माध्यमांचा वापर शिक्षणपद्धतीमध्ये केला जात आहे. त्यामुळे शिक्षण पद्धती ही अलीकडच्या काळामध्ये आपलं रूप आधुनिक पद्धतीने पालटते आहे हे दिसून येत आहे.कोरोना कालावधीत तंत्रस्नेही शिक्षकांनी हजारो ई कंटेंट बनविले आहेत.या बाबतीत जि प शाळांनी व जि प शाळांच्या शिक्षकानी खूप मोठे योगदान दिले आहे.
अलीकडच्या काळामध्ये अनेक *नाविन्यपूर्ण कोर्सेस* उदयास झालेले आहेत .विद्यार्थी नाविन्यपूर्ण शिक्षण घेत आहेत. प्रत्येक क्षेत्रांमध्ये नवीन नवीन नाविन्यपूर्ण कोर्स निर्माण झाल्यामुळे अनेक क्षेत्रांमध्ये व्यवसायाची संधी देखील निर्माण झालेली आहे. पूर्वीच्या काळी कोर्सेसची संख्या कमी होती, मात्र सध्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक नावीन्यपूर्ण बदल झालेले आहेत .अनेक प्रकारचे शिक्षणाचे मार्ग उपलब्ध झाल्यामुळे अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेले आहेत.
सध्याचे युग हे *संगणकाचे युग* आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. संगणकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे.संगणकाचा वापर शैक्षणिक कारणास्तव मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. संगणकाच्या माध्यमातून आपण कोणत्याही प्रकारचे शिक्षण ऑनलाइन असो वा ऑफलाईन माध्यमातून संगणकाच्या माध्यमातून घेऊ शकतो. संगणकावर इंटरनेट वापरून किंवा इंटरनेट शिवाय काम करू शकतो. अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर आहे जे ऑफलाईन तर काही ऑनलाईन चालतात. त्याच्या माध्यमातून आपण शिक्षण घेऊ शकतो .शिक्षणाच्या विविध पद्धती , प्रकार ह्या संगणकामुळे अत्यंत साध्या-सोप्या झालेल्या आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये संगणकाचा मोठा वापर वाढलेला आहे आणि अतिशय किचकट गोष्टी सोप्या करून सांगण्या मध्ये संगणकाचा हात कोणीही धरणार नाही. संगणकामुळे शालेय माहिती ,ऑफिस ची माहिती असेल कोणत्याही माहितीवर कोणतीही प्रक्रिया आपण करू शकतो .संगणकाचं आणि शिक्षण क्षेत्रातही जवळचं नातं निर्माण झालेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने संगणकाचा वापर शाळांमध्ये केल्यामुळे शिक्षण हे सुलभ झालेला आहे.
तंत्रज्ञानामुळे *जग एकत्र* आलेले आहे. या देशातील शिक्षक ,विद्यार्थी इतर कोणत्याही देशातील विद्यार्थ्यांशी ,शिक्षकाशी सहजपणे बोलू शकतो.व्हिडीओ रुपात चर्चा करू शकतो. शिक्षण पद्धतीतील बदल, अनेक नवीन प्रवाह ,त्या प्रवाहाची देवाण-घेवाण शिक्षण क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये झालेले आहे. त्याचा फायदा सर्व जगातील देशांना व शिक्षण पद्धतीमध्ये होत आहे.
*ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग* मुळे विविध ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून सर्व विद्यार्थी शिकत आहेत. हसत-खेळत विद्यार्थी ऍक्टिव्हिटी करत आहेत. त्याच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ॲक्टिविटी बेस्ड लर्निंग मुळे प्राथमिक शिक्षण हे सहज व सोपे झालेला आहे.
*अध्ययन निष्पत्ती* चा वापर प्राथमिक शिक्षणामध्ये झालेला आहे. वर्गनिहाय अध्ययन निष्पत्ती ठरवलेल्या आहेत, त्या अध्ययन निष्पत्ती नुसार अध्यापन केलं जातं. त्यामुळे नेमके अपेक्षित विद्यार्थ्यांना काय आलं पाहिजे. याचा विचार करून शिक्षण दिलं जातं. याचा फायदा असा होतो की विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व सर्व क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे.अध्ययन निष्पत्तीमुळे विद्यार्थी व शिक्षकांची आंतरक्रिया चांगल्या पद्धतीने होऊन जाऊन विद्यार्थ्यांना नेमकं अपेक्षित काय आलं पाहिजे या गोष्टीची जाणीव शिक्षकांच्या मध्ये होऊन नेमकी अपेक्षित मूल्ये शिक्षक विद्यार्थ्यांना देऊ शकतो.
सध्याची शिक्षण पद्धती ही हायटेक व स्मार्ट झालेली आहे *हायटेक व स्मार्ट शिक्षण पद्धती* मुळे शिक्षणाची प्रगती झालेली आहे. विद्यार्थी फक्त पुस्तकच वाचत नाही तर त्याच पद्धतीने हायटेक शिक्षणपद्धती वापरून स्मार्ट शिक्षण घेत आहे. याच्यामध्ये अनेक पद्धतींचा वापर केला जात आहे. संगणक, मोबाईल,टॅब,इंटर ऍक्टिव्ह बोर्ड,अँड्रॉइड टीव्ही याच्या माध्यमातून हायटेक व स्मार्ट शिक्षण विद्यार्थी घेत असल्यामुळे सध्याची पिढी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त शिक्षण घेत आहे व विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये,गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे.
*ई बुक व फ्लिपबुक* ई-बुक व फ्लिपबुक चा वापर अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. प्रत्यक्ष पुस्तक आपण वापरतो त्याच पद्धतीने ई बुक चा वापर करून देखील शिक्षण घेऊ शकतो. ही ईबुक हे आपल्याला कुठेही ऑनलाईन,ऑफलाईन उपलब्ध होऊ शकते. फ्लिपबुक व ई-बुक ही संकल्पना नवीन असून ई बुक कमी जागेमध्ये कुठेही उपलब्ध होतात. ई बुक कायमस्वरूपी ही राहू शकते. ही बुक सहज कुठेही आपल्याला उपलब्ध होऊ शकते.ई-बुकच्या माध्यमातून शिक्षण विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. अशा पद्धतीने पुस्तक जसे वाचतात तशाच पद्धतीने ईबुक व फ्लिपबुक चा वापर करून विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात.
*तंत्रस्नेही शिक्षक* ही कल्पना अलीकडच्या काळामध्ये उगम पावली आहे मात्र अलीकडे सर्वच शिक्षक तंत्रस्नेही होत आहेत. तंत्रज्ञानाची माहिती सर्व शिक्षकांना झाल्यामुळे अध्यापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करता येतो. आधुनिक शिक्षण हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक काम करत आहेत. अलीकडे तंत्रस्नेही शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणे मध्ये वाढ होत असून अतिशय चांगल्या पद्धतीने तंत्रस्नेही शिक्षक काम करत आहेत . विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याचं काम हे तंत्रस्नेही करत आहेत.जिल्हा परिषदेचे शिक्षक हे मोठ्या प्रमाणात तंत्रस्नेही दिसून येत आहेत.
*इंटरनेट* इंटरनेट शिवाय पर्याय नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शिक्षणपद्धतीमध्ये इंटरनेटचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो .कोणतीही गोष्ट असेल काही असेल तर इंटरनेटवर आपल्याला शोधल की लगेच सापडत . कोणतीही अडचण असेल ,कोणती माहिती असेल, तर आपण इंटरनेटवर गुगलच्या माध्यमातून आपण कोणतीही गोष्ट सहजासहजी शोधू शकतो. अनेक पर्याय इंटरनेटवर अनेक वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहेत. कोणतीही गोष्ट इंटरनेटवर सहज शक्य आहे असं म्हटलं तरी ते चुकीचे ठरणार नाही. इंटरनेटवर अलीकडे बऱ्याच सुविधा सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा देणाऱ्या वेबसाईट,सॉफ्टवेअर निर्माण झालेले आहेत. त्या वेबसाइटच्या माध्यमातून इंटरनेटवर कोणत्याही प्रकारचे शिक्षण किंवा शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला आहे.त्यामुळे शैक्षणिक क्रांती इंटरनेट मुळे झालेले आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.
*व्हिडिओ कॉन्फरन्स* ऑनलाइन शिक्षणासाठी खूपच उपयुक्त आहे.कोरोनाच्या काळामध्ये प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत जाता येत नाही. मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत सहज ऑनलाईन पोहोचू शकतो, हे व्हिडिओ कॉन्फरन्स ने दाखवून दिल आहे. यामध्ये विविध प्रकारच्या वेबसाइट, ॲप्स काम करत असून जसे सर्व विद्यार्थी व शिक्षक एकत्र येऊन प्रत्यक्ष वर्गांमध्ये शिकतात किंवा मीटिंग घेतात अशा पद्धतीने ऑनलाइन मीटिंग किंवा कॉन्फरन्स या एप्लीकेशन च्या माध्यमातून किंवा वेबसाईट च्या माध्यमातून घेता येते. एकाच ठिकाणी एकाच वेगवेगळ्या शहरांमध्ये राहून सर्वजण एकाच वेळी व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून एकत्र येऊ शकतात. त्याच्यामुळे कुठेही प्रवासाची कुठेही धावपळ करायची गरज नाही. विद्यार्थी व शिक्षक या कुठेही असुद्या ,वेबिनार, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते लगेच एकत्रित येतात. व्हिडीओ कॉन्फरन्स घेतल्यामुळे वेळेची बचत देखील होते आणि सध्याच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा देखील चांगला पर्याय व्हिडीओ कॉन्फरन्स मुळे झालेला आहे.
एकंदर काय तर आधुनिक डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थी प्रगती व गुणवत्ता वाढ झाली आहे व त्याचा चांगला परिणाम देशाच्या प्रगतीवर झाला असून देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये महा क्रांती झाली आहे.
*शब्दांकन*
प्रदिप कुंभार.....✍🏻

Comments
Post a Comment