विकास पर्व अर्बन निधी बँक चे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
विकास पर्व अर्बन निधी बँक चे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
कराड - प्रतिनिधि,
विकास पर्व अर्बन निधी बँकेचे माध्यमातून लोकांना चांगली व पारदर्शक सेवा देण्यासाठी या संस्थेची स्थापना केली असल्याचे मत संस्थेच्या चेअरमन सौ उषा वाघमारे यांनी व्यक्त केले. त्या संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कराड दक्षिण चे उपाध्यक्ष राहुल भोसले होते. यावेळी माथाडी कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय निकम, आर के मरिन करिअर अकॅडमी चे राहुल कुमार खांडके एस पी बिल्डर्स चे सुहास जगताप, जयवंत घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना वाघमारे म्हणाल्या की सर्व सामान्यांना या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनांची माहिती देण्यात येईल व त्वरित व पारदर्शक सेवा देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहु. या संस्थेचे व्हा. चेअरमन अमोल कणसे संचालक महेंद्र गवळी, महेंद्र थोरात, उमेश साळुंखे, चंद्रकांत जगताप, पंकज पवार, विश्वजीत जाधव, व संस्थेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Comments
Post a Comment