माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या मंत्रालय व विधिमंडळ संपर्क प्रमुख सागर पाटील यांची निवड.

 माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या मंत्रालय व विधिमंडळ संपर्क प्रमुख  सागर पाटील यांची निवड.

सातारा: माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र फाऊंडेशन अंतर्गत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या मंत्रालय व विधिमंडळ संपर्क प्रमुख पदी मंद्रुळकोळे (पाटील आवाड)  ता.पाटण येथील मा.सागर दिलीप पाटील  यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. माहिती अधिकार, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार व पत्रकारितेची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिपक कांबळे, राष्ट्रीय महासचिव श्री कमलेश शेवाळे, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष श्री महेश सारणीकर, यांच्या संमतीने,महाराष्ट्र राज्य उपाध्यश अमर बेंद्रे, महाराष्ट्र राज्य सचिव सुभाष भोसले,महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख श्री इद्रीस सिद्दीकी  यांच्या शिफारसीने राष्ट्रीय लोकशाही विचारधारेला अभिप्रेत व लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य ही लोकशाही संकल्पना यशस्वी करण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची ध्येयधोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवून अधोरेखित करण्याची जबाबदारी आपणावर सोपविण्यात येत आहे. संबंधित नियुक्तीस राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिपक कांबळे,माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र, व सागर पाटील मित्रपरिवार, व्यापारीवर्गातर्फे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .