मोरणा विभागासह पाटण तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंची डरकाळी,पाटणकर गटाला धक्का.
मोरणा विभागासह पाटण तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंची डरकाळी,पाटणकर गटाला धक्का.
मोरणा विभागातील निवडणूक लागलेल्या १० ग्रामपंचायती पैकी आठ ग्रामपंचायती वर शिवसेना पुरस्कुर्त देसाई गटाचा झेंडा फडकवला आहे. यामध्ये आंबेघर तर्फ मरळी बिनविरोध, गोकुळ तर्फ पाटण देसाई गट ४ व पाटणकर ३ सत्तांतर,वाडीकोतावडे देसाई गट ३ व पाटणकर गट २ ,धावडे बिनविरोध, पाचगणी बिनविरोध, आटोली बिनविरोध, कोकिसरे देसाई गट ९ व पाटणकर गट ० , पेठ्शिवापूर देसाई गट ५ व अपक्ष २ या ग्रामपंचायतींचा सामवेश आहे.काहीर या एका ग्रामपंचायती मध्ये देसाई गट ३ व पाटणकर गट ३ असे समसमान उमेदवार निवडून आले आहेत.डोंगळेवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पुरस्कुर्त पाटणकर गटाची सत्ता अबाधित राहिली असून देसाई गट २ व पाटणकर ४ असे उमेदवार राहिले आहेत.एकंदरीत मोरणा विभागात देसाई गटाचा बालेकिल्ला अबाधित राहिला असून मोरणा विभागासह पाटण तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभुराज देसाईंनि डरकाळी फोडली असून पाटणकर गटाला तालुक्यात जोरदार धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. पाटण तालुक्यात प्रत्यक्ष मतदान झालेल्या ७२ ग्रामपंचायती पैकी ४१ ग्रामपंचायतीवर निर्विविवाद वर्चस्व राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पुरस्कृत देसाई गटाने राखले आहे तर यात बहुतेक ग्रामपंचायती सत्तांतर करत देसाई यांच्याकडे आली आहेत.पाटणकर गटाकडे २० तर ११ ग्रामपंचातीमध्ये देसाई पाटणकर गटाचे समसमान उमेदवार निवडून आले आहेत,महाविकास आघाडी २ कॉंग्रेस 1 तर पाटण तालुक्यात सर्वांचे लक्ष वेधून धरलेले तारळे ग्रामपंचायत हि राष्ट्रवादी व भाजपा यांच्या युतीने जिंकली असून १० तर शिवसेना ७ उमेदवार निवडून आले.एकंदरीत संपूर्ण पाटण तालुक्यात गृहराज्यमंत्री देसाई यांनी चांगलीच मजबूत पकड निर्माण केली आहे हे आजच्या ग्रामपंचायत निवडणूक निकालातून स्पष्ट झाले आहे.
पाटण तालुक्यातला विजय हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे,लोकनेते बाळासाहेब देसाई व स्वर्गीय आबासाहेब यांच्या विचारांचा विजय असून राज्यात येणार्या संकटांना संयमतेणे मार्ग काढून कोरोना सारख्या महामारीला हद्दपार करण्यासाठी शिवसेना प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामावर ग्रामीण भागातील जनतेने दाखवलेला हा प्रामणिक विश्वास आहे.

Comments
Post a Comment