लोकनायक, राजकारणातील लोहपुरुष ,पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता नेता हरपला.


लोकनायक, राजकारणातील लोहपुरुष ,पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता नेता हरपला.



             ब्यूरो रीपोर्ट - प्रतापसिंह संभाजीराव जगताप.   

                माजी सहकार मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचे दिनांक 4 /1 /2021 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आज त्यांच्या उत्तरकार्य विधी त्यानिमित्ताने श्री प्रतापसिंह जगताप यांनी त्यांना वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली.माजी सहकार मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर हे राजकारण सहकार तसेच समाजकारणातील एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय राहिले स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा त्यांना लाभलेला होता त्यामुळे देश प्रेम त्यांच्या नसानसात भरलेले होते गांधी-नेहरूंच्या विचारांवर त्यांची मोठी श्रद्धा होती यशवंतरावजी चव्हाण हे यांच्या राजकारणातील आदर्श होते, जिल्हा परिषद सदस्य या रूपाने त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली त्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे सलग 52 वर्ष संचालक कराड दक्षिण मतदार संघाचे सलग पस्तीस वर्षे आमदार दोन वर्ष महाराष्ट्र राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री चार वर्ष विधी न्याय व पुनर्वसन मंत्री एक वर्ष सहकार व वस्त्रोद्योग मंत्री अशी उत्तुंग झेप त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रात घेतली पण हे सहजासहजी घडले नाही त्यासाठी त्यांना जबरदस्त संघर्ष करावा लागला परिश्रम घ्यावे लागले आपल्या सहकाऱ्यांना ते नेहमी सांगत की संघर्षाने माझा पाठलाग कधी सोडला नाही आणि मी संघर्षाचा पाठलाग कधी सोडला नाही, मंत्रीपद लाभले तरी डामडौल नाही अगदी साधी राहणी काका केवळ आमदारपद मंत्रीपद मिरवत राहिले नाहीत तर आपल्या आमदार व मंत्रीपदाचे माध्यमातून त्यांनी आपल्या मतदार संघाचा संपूर्ण कायापालट केला विकासाचा डोंगर उभा केला वाड्या-वस्त्यांवर लाईट रस्ते पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण केली डोंगरी विकास निधी प्राप्त करून दिला व त्या भागाचा कायापालट केला मतदारसंघात तलावाची साखळी निर्माण केली देशातील पहिला नदीजोड प्रकल्प काकांनी उभा केला, पाचवड तिर्थक्षेत्राचा विकास गावोगावी स्मशानभूमीची सुविधा समाज मंदिराची उभारणी केली त्याचबरोबर साहित्य संमेलन, स्वातंत्र्यसैनिकांचा मेळावा याद्वारे समाजप्रबोधनाची त्यांनी काम केले अनेकांचे संसार त्यांनी उभे केले त्यांचा जनसंपर्क दांडगा होता स्मरणशक्ती अफाट होती काकांनी मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात सक्षम कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. प्रत्येक कार्यकर्त्याला ते नावानिशी हाक मारत कार्यकर्त्यांची काकांच्या वरती प्रेम होते काकांनी जनता जनार्दना मध्ये पंढरीचा पांडुरंग पाहिला काका म्हणत मतदारसंघ माझ्या हृदयात आहे लोकसंपर्क व लोकांचे प्रेम हेच त्यांचे समाजकारणातील भांडवल होते काका पुरोगामी विचाराचे नेते होते जातीयवादी शक्तींना त्यांनी कधीही हातमिळवणी केली नाही याचे उदाहरण द्यायचे झाल्यास सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी पाठिंबा देणारे काका एकमेव मराठा प्रथम आमदार होते काका हे राजकारणातले खरोखर लोहपुरुष होते राजकारणात आणि कौटुंबिक जीवनात अनेक संकटे आली तरीही काका कधी डगमगले नाहीत पुन्हा पुढे झुकले नाहीत वास्तविक काकांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी यायला हवे होते परंतु त्यांना ते मंत्रीपद कधी मिळाले नाही उलट अनेकांनी त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला मनात आणले असते तर पक्षांतर करून तर पक्षांतर करून काकांनी सत्ता मिळू शकले असते पण पण  काँग्रेस पक्षावरील निष्ठेमुळे त्यांनी तसे केले नाही काका भ्रष्टाचारापासून कोसोदूर होते म्हणून त्यांनी उभारलेल्या व विकसित केलेल्या संस्थांमध्ये भ्रष्टाचाराला थारा नव्हता कोडोली हे आमचे गाव कराड दक्षिण मतदार संघातील कृष्णाकाठी एक छोटे गाव परंतु या गावाचे व काकांचे अतूट नाते होते या गावावर काकांचे विलक्षण असे प्रेम होते काकांनी या गावात पाऊल टाकण्यापूर्वी कोडोली गाव विकासापासून पूर्णपणे वंचित होते गावामध्ये हे अनेक साथीचे थैमान ना रोगांचे थैमान होते गावाला नरकाचे स्वरूप प्राप्त झाले होते पण विकास कामाच्या माध्यमातून काकांनी या गावाला स्वर्ग बनविण्याचे काम केले व गावाला गावपण आले, गावामध्ये एसटीची सोय लाईटची सोय पिण्याच्या पाण्याची सुविधा रस्ते यापासून गाव वंचित होते ही बाब जेव्हा काकांच्या निदर्शनास आली तेव्हा त्यांनी या गावचा कायापालट करण्याचा निर्धार केला व या गावांमध्ये सर्व सुविधा सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या कावै कोडोली रस्ता गावातील पाणंद रस्त्याचे डांबरीकरण कृष्णाघाट दलित वस्तीमध्ये समाज मंदिर भव्य असे ग्रामपंचायत कार्यालय पाणी पुरवठा योजना अधि काम केले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील भुयारी गटार योजना सर्वप्रथम कोडोली गावागावांमध्ये राबवली माझे वडील कै ऍड संभाजीराव जगताप आबा व काका यांचे अनेक घनिष्ठ संबंध होते ते काकांचे  कॉलेज जीवनापासून सहकारी होते काकांच्या राजकारणामध्ये त्यांनी मोलाची साथ दिली प्रेमाने काका माझ्या वडिलांना राजे म्हणून संबोधित काका आणि आमच्या कुटुंबाचे घरगुती व जिव्हाळ्याचे संबंध होते आणि म्हणूनच आमच्या कुटुंबावर जेव्हा जेव्हा संकट आले दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा काकांनी सावलीसारखी आम्हाला साथ दिली खंबीरपणे पाठीशी उभा राहिले काका जणू आमच्या सुखदुःखाचे वाटेकरी बनून राहिले माझे वडील वारल्या नंतर सुद्धा काका फोन करून चौकशी करत काकांचे आमच्या घरी सतत येणे जाणे असे दुग्ध विकास मंत्री असताना काकांनी एकदा आपल्या कोल्हापूरच्या मित्रमंडळी साठी नही भोजनाचे आयोजन केले होते तेव्हा माझ्या वडिलांना निमंत्रण देण्यास काका विसरले नव्हते आमचे वडिलांवर काकांचा प्रचंड विश्वास होता त्यामुळे त्यांनी आमच्या वडिलांना कराड तालुका समन्वय समिती सदस्य सातारा युवक काँग्रेस सदस्य तसेच कोयना सहकारी बँकेचे चेअरमन अशा विविध पदांवर काम करण्याची संधी दिली असा हा लोकनायक राजकारणातील लोहपुरुष पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता नेता आपल्या पुत्रवत जनता-जनार्दनाला सोडून दिनांक 4/ 1/ 2019 रोजी अनंतात विलीन झाला सोमवारी मरण्याचे भाग्य या पुण्य आत्म्यास लाभले सहकार शिक्षण राजकारण अर्थकारण व समाजकारणातील यादी दीपस्तंभास भावपूर्ण श्रद्धांजलि.



शब्दांकन : - श्री प्रतापसिंह संभाजीराव जगताप.

                 कोडोली ,   तालुका - कराड, जिल्हा - सातारा.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .