गोंडवाना न्यूजच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या आंदोलनाला यश.
गोंडवाना न्यूजच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या आंदोलनाला यश.
शिराळा - प्रतिनिधि,
सोनवडे ता. शिराळा जि.सांगली येथे हरिजन वस्ती मध्ये विशेष घटक योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेला निधी दुसरीकडे गेल्याच्या तक्रारीवरून संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप कांबळे यांनी दिनांक ५ जानेवारी २०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालय सोनवडे येथे आंदोलन केले त्या आंदोलनाला भरघोस यश मिळाले. प्रशासनाने आंदोलनकर्त्ये डॉ.संदीप कांबळे यांना काम पूर्ण करण्याचे पत्र देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पत्र स्विकारुन डॉ.संदीप कांबळे यांनी आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. यावेळी शिराळा वाळवा शाहूवाडी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना उपस्थित होत्या.
प्रकाश लोखंडे व नानासाहेब कांबळे, बाबर साहेब , ज्ञानदेव कांबळे ,संदीप कांबळे सोनवडे यांनी आंदोलनाची धुरा सांभाळली.
सोनवडे गावातील हरिजन वस्तीतील सर्व नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बाळासाहेब कांबळे, शितूरकर , वैभव वाघमारे ,विठ्ठल सोनवले, विलास कांबळे ,पांडुरंग नांगरे अमर माने ,दीपालीताई विजयराव कांबळे , शशिकांत चव्हाण, शंकर कांबळे , सुरेश मारुती कांबळे ,सुनील घोलप आदी. तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी कोकरुड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक वाघ साहेबांनी आपली यंत्रणा सतर्क ठेवून मोलाचं सहकार्य केले.

Comments
Post a Comment