Posts

Showing posts from June, 2025

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

Image
  आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वतीने येळगाव जि.प.गटात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. उंडाळे -प्रतिनिधी. कराड दक्षिणचे आश्वासक लोकप्रिय आमदार मा.श्री.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या वतीने, येळगाव जिल्हा परिषद मतदार संघामध्ये, मनव, खुडेवाडी, साळशिरंबे, महारुगडेवाडी, जिंती या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधिल गोर गरीब, होतकरू व सर्वच विद्यार्थीना वही, पेन्सिल, शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी, भाजपा कराड दक्षिण-पश्चिम मंडल अध्यक्ष मा.प्रविण साळुंखे (दत्ता भाऊ), भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष मा.पंकज पाटील, कुस्ती संघटक पै.तानाजी चवरे, मनव गावचे उपसरपंच मा.दादासो शेवाळे, मनव विकास सेवा सोसायटी चेरमन मा.संताजी शेवाळे, महारुगडेवाडी गावचे सरपंच मा.बाळकृष्ण माने, तंटामुक्ती अध्यक्ष मा.जंहागिर शेख, मा.कृष्णत कंळत्रे, साळशिरंबे गावचे माजी उपसरपंच पै.मा.जयवंतराव यादव, जिंती गावचे माजी उपसरपंच पै.मा.जयवंतराव शेवाळे, जिंती गावचे पोलीस पाटील मा.संतोष पाटील, मनव गावचे पोलीस पाटील मा.कृष्णत पोळ, पै.मा.बापूराव पोळ, मा.विलास चवरे, मा.सागर विभुते, मा.दादासो खुडे इ...

शिष्यवृत्तीकरीता पात्र विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने फी वसूल केल्यास महाविद्यालयांवर गुन्हा.

Image
  शिष्यवृत्तीकरीता पात्र विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने फी वसूल केल्यास महाविद्यालयांवर गुन्हा. _____सहायक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव सातारा दि.30.: सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक-इबीसी-२००३/प्र.क्र.३०१/मावक-२ दिनांक-१ नोव्हेंबर, २००३ अन्वये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसूल करू नये, तसे आढळल्यास संबंधित महाविद्यालय विरोधात फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयांना याबाबत वेळोवेळी सूचित करण्यात आले आहे. तरीही काही महाविद्यालयांकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेल्या व शिष्यवृत्तीकरीता पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून फी वसूलीबाबत कोणत्याही तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित महाविद्यालय विरोधात फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशा सूचना सातारचे समाज कल्याण सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

श्री. कोटेश्वर विद्यालय गोवे येथे विविध उपक्रम साजरे.

Image
  श्री. कोटेश्वर विद्यालय गोवे येथे  विविध उपक्रम साजरे. सातारा - प्रतिनिधी. गोवे ता.सातारा  येथे श्री.कोटेश्वर विद्यालय व ज्यु.कॉलेज गोवे तसेच प्राथमिक शाळा गोवे यांनी वारकरी दिंडी चे आयोजन केले होते.यावेळी सर्व विद्यार्थी वारकरी वेशभूषेत आले होते मुलींनी नऊवारी साडी ,डोक्यावर तुळस ,गळ्यात टाळ वेशभूषा केली होती. अखंड हरिनाम यामुळे सर्व वातावरण भक्तिमय झाले होते.विद्यार्थी विविध संतांच्या वेशभूषेत आले होते.वारकरी दिंडीत विद्यार्थी ग्रंथवाचन व वृक्षारोपण करण्याच्या घोषणा देऊन जनजागृती करत होते. विद्यालयाने या आधी शाळा प्रवेशोस्तव ,मोफत पुस्तक वाटप सायकल वरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी स्व.एकनाथ जगताप फाऊंडेशन सासवड व परिवर्तन संस्था पुणे यांच्या माध्यमातून हेल्मेट वाटप.ग्रंथ प्रदर्शन ,प्रयोगशाळा साहित्य प्रदर्शन ,AI लॅब ओळख, छत्रपती शाहू महाराज जयंती वक्तृत्व स्पर्धा,शिक्षक पालक सभा,माता पालक सभा इ.उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या सर्व कार्यक्रमांसाठी संस्थेचे अध्यक्ष ,सचिव ,सर्व संचालक मंडळ ,पालक उपस्थित होते.

सारथी संस्थेच्या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार.

Image
  सारथी संस्थेच्या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार. सारथीच्या युपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार पुणे, दि. २९ : सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ही संस्था नवीन असून या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होण्यासाठी सारथीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी येणाऱ्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून नवीन विद्याथ्यांना मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात युपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास सारथीचे संचालक उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, डॉ. नवनाथ पालकर, किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सारथीचे व्...

नुने ता. पाटण वि. का. से. सो. पंचवार्षिक निवडणूकीत मम्हादेवी केदारेश्वर शेतकरी विकास पॅनलचा विजय.

Image
नुने ता. पाटण वि. का. से. सो. पंचवार्षिक निवडणूकीत मम्हादेवी केदारेश्वर शेतकरी विकास पॅनलचा विजय. पाटण- प्रतिनिधी. नुने ता. पाटण वि. का. से. सो. पंचवार्षिक निवडणूकीत मम्हादेवी केदारेश्वर शेतकरी विकास पॅनलचा विजय मिळवला. पाटण येथील कोयना दौलत निवासस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई यांची नुने विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या मम्हादेवी केदारेश्वर शेतकरी विकास पॅनलमधील सर्व नवनिर्वाचित संचालकांनी आणि नुने ग्रामस्थांनी भेट घेतली.  या वेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा) यांचीही भेट झाली.  सर्व विजयी संचालकांचे आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना एकच गोष्ट सांगितली नुने गावाने पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेचा भगवा झेंडा सोसायटीवर फडकवला आहे. संपूर्ण पॅनलने १२-० असा धडाकेबाज विजय मिळवून पाटण तालुक्यात अभिमानाची निशाणी निर्माण केली आहे. हा विजय केवळ निवडणुकीचा नाही, तर नुने गावाच्या एकजुटीचा, विकासाच्या इच्छाशक्तीचा आणि शिवसेनेवरच्या विश्वासाचा आहे. गावच्या सर्वांगीण विकासा...

शिराळा तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांची चौकशी व्हावी. ___ॲड. रवी पाटील.

Image
शिराळा तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांची चौकशी व्हावी.  ___ॲड. रवी पाटील. शिराळा -प्रतिनिधी.  दलित वस्ती सुधार योजनेतील शिराळा तालुक्यातील विविध कामे विविध ठिकाणी झाली आहेत त्यांची चौकशी व्हावी. अन्यथा शिराळा तालुक्यातील सर्व संघटना एकत्र तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती.   कॉंग्रेस आय कमेटी शिराळा तालुका अध्यक्ष ॲड. रवी पाटील यांनी दिली.चिंचोली ता.शिराळा येथील बौद्ध समाज बांधवांचे वारणा कॅनॉल मुळे पुनर्वसन झाले आहे. पांडुरंग घोलप ते विश्वास घोलप यांच्या घरामागील संरक्षण भिंत दोन वर्षो पुर्वी  अती पावसाने पडलेली आहे त्या संरक्षण भिंतीची मंजुरी मिळावी म्हणून दि 10/12/24रोजी मे.तहसीलदार सो शिराळा यांना निवेदन दिले होते. दलित वस्ती सुधार योजनेतील संरक्षण भिंत व सामाजिक सभागृह या कामांना  तीन वर्षापासून मंजुरी मिळत नाही.अनेक गावात सामाजिक सभागृह नाहीत  संरक्षण भिंतीची आवश्यकता असताना शासन या कामांना निधी देत नाही. त्यामुळे शिराळा तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेतील कामांची चौकशी व्हावी व इतर ठिकाणी होणाऱी कामे त्वरित थांबवावी य...

वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार.

Image
  वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता  वाढविणार. - सामजिक न्याय मंत्री   संजय शिरसाट.   नागपूर, दि. 28 :  अनुसूचित जाती प्रवर्गातील  विद्यार्थ्यांसाठी   वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी   विद्यार्थी  क्षमतेत वाढ  करण्याची गरज लक्षात घेऊन  वसतिगृहाची  प्रवेश क्षमता  वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सामजिक न्याय मंत्री   संजय शिरसाट यांनी आज दिलेत.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन  येथे सामजिक न्याय मंत्री संजय  शिरसाठ याच्या  अध्क्षतेखालील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला, त्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते यावेळी  नागपूर विभागातील सर्व उपायुक्त व संशोधन अधिकारी,  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उपस्थित होते.      बहुतांश वसतिगृहाची  क्षमता  ही केवळ शंभर विद्यार्थी  क्षमता असलेली आहे. त्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थ्यां...

हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
  हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शेतमालाच्या बाजारमूल्य निश्च‍ितीमुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा. मुंबई, दि. २७: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारमूल्य मिळावे यासाठी, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, स्मार्टअंतर्गत पहिल्या टप्प्यात पुणे येथे कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी ‘हेजिंग डेस्क’ सुरू केला आहे. टप्प्या-टप्प्याने इतर पिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी त्यांच्या उत्पादनांच्या भविष्यातील किंमतीतील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळू शकतात. ‘सेबी’चे नियंत्रण असलेल्या एनसीडीईएक्स (NCDEX) संस्थेच्या कमोडिटी मार्केट्स आणि संशोधन संस्थेने (NICR) या प्रकल्पासाठी सहकार्य केले आहे. हा उपक्रम कृषी क्षेत्रातील विकासाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितले. ‘हेजिंग डेस्क’ म्हणजे काय ‘हेज’ म्हणजे बाहेरून येणाऱ्या संकटांपासून संरक्षण देण्यासाठी, त्यांना अटकाव करण्यासाठी बांधलेले साधन, घराला जसे दार,...

बी.आर.एस.पी च्यावतीने शाहू महाराज जयंती साजरी.

Image
बी.आर.एस.पी च्यावतीने शाहू महाराज जयंती  साजरी. मुंबई - प्रतिनिधी. सामाजिक समतेचे प्रणेते लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्यावतीने चेंबूर पश्चिम रेल्वे स्टेशन याठिकाणी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्थानिकांना लाडू वाटप करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुंबई अध्यक्ष दिपक चौगुले, प्रबुद्ध परिवार अध्यक्ष वैभव सोनवणे, बी.आर.एस.पी चेंबूर अध्यक्ष सतेश मस्के, जेष्ठ नेते राजाराम आढाव, जेष्ठ नेते बापूसाहेब चंदनशिवे, अरुण बनसोडे, अमर भंडारे, प्रशांत आढाव, अभिजित कांबळे, प्रवीण पवार शार्दूल नकुल, बाळू बोरुंडे इतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती संपन्न.

Image
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती संपन्न. शिराळा -प्रतिनिधी. वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती समारंभ संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्रीमती ए. आर. पाटील. यांनी केले.कार्यक्रम अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अरविंद सदावर्ते होते.अध्यक्षांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच  यावेळी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली व अंमली पदार्थ विरोधी उद्बोधन केले.  विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी आर्या घागरे,आराध्या घागरे,समर्थ बादरे यांनी भाषणे केली.  विद्यालयातील श्री.बी.एम.नलवडे  यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनचरित्र याविषयी माहिती दिली.कार्यक्रम अध्यक्षांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उदार व उदात्त कार्याचा आढावा घेतला. भाषण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे देऊन गौरव केला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. व्ही.डी. पाटील यांनी केले.तर ...

लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमले कोल्हापूर

Image
  लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमले कोल्हापूर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा. कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय ! या जयघोषाने शाहू महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या शोभा यात्रा व समता दिंडीला कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्हा प्रशासन व सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या वतीने दसरा चौकात समता दिंडीसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.  समता दिंडीचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करुन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी शिर्के, महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे, जिल्हा समाजक...

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

Image
  मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)        मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त) गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- (मंगळवार, दि. २४ जून, २०२५) • महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग - पवनार (जि.वर्धा) ते पत्रादेवी ( जि. सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास मान्यता. राज्यातील साडेतीन  शक्तिपीठ , दोन ज्योतिर्लिंग  आणि  पंढरपूर  अंबेजोगाई सहित  १८ तीर्थक्षेत्रांना जोडणारा  शक्तिपीठ महामार्ग. प्रकल्प महामंडळामार्फत राबवणार, प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी २० हजार  कोटी  रुपयांच्या तरतुदीस मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग) • आदिवासी शासकीय वसतीगृहांमधील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता व आहार भत्त्यामध्ये वाढ. दरमहा मिळणाऱ्या निर्वाह व आहार भत्त्यात दुपटीने वाढ, वार्षिक शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात भरीव वाढ. (आदिवासी विकास विभाग) • कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाच्या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)  • महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ मध्ये...

लोकांच्या सार्वजनिक हिताच्या कामांना प्राधान्य द्यावे– पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Image
  लोकांच्या सार्वजनिक हिताच्या कामांना प्राधान्य द्यावे– पालकमंत्री प्रकाश आबिटकर. यावर्षी शालेय, आरोग्य विषयक कामांना भरीव तरतूद, मागील वर्षीचा सर्व 100 टक्के खर्च, यावर्षीच्या 764.62 कोटी रुपयांच्या नियोजित कामांबाबत चर्चा शालेय स्तरावर भौतिक सुविधांसह गुणवत्तेवर भर द्या – सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ कोल्हापूर, दि. 23: प्रशासनातील प्रत्येक विभागाने शासकीय योजना राबवित असताना लोकांच्या सार्वजनिक हिताला प्राधान्य द्यावे अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास, औकाफ राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री कोल्हापूर माधुरीताई मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत असगावकर, आमदार अरुण लाड, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, ...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्वल यश.

Image
  कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्वल यश. उंडाळे -प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२५ पदविका औषध निर्माणशास्त्र (डी. फार्म) प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव, ता. कराड या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश संपादन केले आहे. त्यामध्ये प्रथम वर्षाचा निकाल ७८ टक्के लागला असून  वैभवी रवींद्र वरगुंटे हिने ८०.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर श्वेता तुलसीदास लोहार हिने ७६.१० टक्के गुणासह द्वितीय क्रमांक तर अस्मिता दिनकर महानवार हिने ७५.७० टक्के गुणासह तृतीय क्रमांक पटकावला. तसेच द्वितीय वर्षाचा निकाल ९१ टक्के लागला असून आदित्यराज दीपक कुंभार याने ७९.३६ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक, प्रियांका संजय काकडे ७८.९१ टक्के गुणासह द्वितीय क्रमांक व मयुरी रमेश मस्कर ७८.०९ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. या यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांची इच्छा व्यक्त करताना हे महाविद्यालय एनबी...

योग ही आपली परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली ____मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
  योग ही आपली परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली ____मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:- योग ही आपली परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती असून भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी असा प्रयत्न सर्व मिळून करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'वारकरी भक्तीयोग' कार्यक्रमात केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच उपस्थित मान्यवर व वारकरी यांच्याकडून योग प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाणे यांच्या पथकाने योगाभ्यास करवून  घेतला. विविध योगासने व प्राणायाम यावेळी करण्यात आले. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, विठ्ठल रुख्मिणी संस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा संचालक शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र ...

अखेर जिल्हा प्रशासनाने केले नवे निर्देश जारी! नियमात केली शिथिलता.

Image
  अखेर जिल्हा प्रशासनाने केले नवे निर्देश जारी! नियमात केली शिथिलता.   नियमांचे पालन करून स्वतःची काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घेण्याचे केले अहवान. गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी या पर्यटन स्थळावर घालण्यात आलेली बंदी अखेर जिल्हा प्रशासनाने उठवली. सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावरील बंदी हटवली मात्र प्रशासनाने पर्यटकांना कडक निर्बंध घातलेले आहेत. सातारा जिल्हा प्रशासनाचे नवे निर्देश. 1) पावसामुळे वेगाने वाहणा-या पाण्यात उतरणे व पोहणे. 2) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे, 3) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे धबधबे, द-यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणेस व कोणत्याही स्वरुपाचे चित्रिकरण करणे. 4) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्यांचे परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे, 5) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे. 6) वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल असे वेगाने चालविणे. 7) वाहनांची ने-आण...

'सहकार से समृद्धि' राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

Image
  आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री,केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित 'सहकार से समृद्धि'  राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन. देशात २ लाख नव्या पॅक्स सहकारातून ग्रामीण परिवर्तनाला समृद्धीची दिशा - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. मुंबई, दि. २० : संपूर्ण जगासाठी सहकार ही आर्थिक व्यवस्थेची संकल्पना म्हणून  पाहिले  जाते. परंतु भारतासाठी, सहकार पारंपारिक जीवनशैलीत रुजलेले तत्वज्ञान आहे. एकत्र येणे, विचार करणे, काम करणे, समान ध्येयाकडे पुढे जाणे, आनंदात आणि दुःखात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे, हा भारतीय  जीवनशैलीच्या तत्वज्ञानाचा आत्मा आहे. देशात २ लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) स्थापन करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सहकार परिषदेत केले. हॉटेल फेअरमोंट येथे  ‘सहकार से समृद्धि’ राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे ,माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्र...

कासेगाव येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकास कामांचा शुभारंभ.

Image
  कासेगाव येथे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकास कामांचा शुभारंभ. कासेगाव -प्रतिनिधी. कासेगाव  दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत वार्ड क्रमांक 4 बौध्द समाज मेन रोड ते ढोर समाज ते ओढा क्रॉंकरीटीकरण रस्ता करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष  मा.देवराज पाटील  गावच्या प्रथम नागरिक मा.सौ.कल्पना गावडे  यांच्या हस्ते संपन्न झाला. ज्याच्यां प्रयत्नातून हा रस्ता होणार ते वार्ड क्रमांक 4 चे ग्रामपंचायत सदस्य व  मा.अतुल लाहिगडे  युवा उद्योजक वार्ड क्रमांक 4 च्या सदस्या.सौ.छायाताई पाटील,  तनुजा आत्तार, उपसरपंच मा.सुजित पाटील, यावेळी माजी सरपंच मा.किरण पाटील, दलित महासंघ सांगली जिल्हा अध्यक्ष बापूराव बडेकर,वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा  उपाध्यक्ष अमर माने, माजी  सरपंच दाजी गावडे, बाळासो कांबळे, मकरंद माने, सुशांत माने, कृष्णा आडके, बबन माने,उमेश कांबळे, अतुल माने, नारायण भुते, अक्षय माने, गौरव  पवन कांबळे, अजय माने, ग्रामसेवक मा.राहुल सातपुते  व ग्रामपंचायत सदस्य व सदस्या तसेच समाजातील ज्येष...

कराड दक्षिण भाजपच्यावतीने मलकापूर नगरपरिषदेस निवेदन.

Image
  कराड दक्षिण भाजपच्यावतीने मलकापूर नगरपरिषदेस निवेदन. कराड - प्रतिनिधी. मलकापूर नगरपरिषद कार्यक्षेत्रातील मिळकत धारकांना मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफीसाठी अभय योजना लागू करण्याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डाॅ.अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कराड दक्षिण मंडलाच्यावतीने मुख्याधिकारी प्रताप कोळी यांना निवेदन देण्यात आले यावेळी मंडल मध्य मंडल अध्यक्ष राजेंद्र यादव, मा. विरोधीपक्षनेते हणमंतराव जाधव, तानाजी देशमुख,भारत जंञे,सुरज शेवाळे, नगरसेवक शहाजी पाटील, दिनेश रैनाक,राजू मुल्ला,प्रशांत चांदे, कान्हा लाखे, प्रशांत गावडे, सुर्यकांत खिलारे, संतोष हिंगसे, नंदकुमार बागल,विजेंद्र जाधव,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.  महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका नगरपरिषदा व नगरपंचायत क्षेत्रामध्ये अनेकवेळा मालमत्ता कराची थकबाकी ची रक्कम जास्त असणे, मालमत्ता धारकांची आर्थिक अडचण असणे, या व इतर कारणांमुळे मालमत्ता कराचा भरणा करण्यात येत नाही. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 150 (अ) (1) नुसार बिलाच्या न भरलेल्या रकमेवर संबंधित नगरपरिषद/ नगरपंचायत यां...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले निवेदन.

Image
  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले निवेदन.  कोल्हापूर :- प्रतिनिधी.       जून महिन्यात होत असलेल्या संततधारा पावासाने धरणक्षेत्राबरोबर शेतजमीनीतही पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यामुळे यापुढे पडणा-या पावसाचे पाणी थेट नदीमध्ये प्रवाहित होत राहणार आहे. जुलै , ॲागस्ट व सप्टेंबर महिन्यातील हवामान खात्याकडून पावसाच्या अंदाजाची माहिती घेऊन १५ ॲागस्ट पर्यंत अलमट्टी धरणातील पाणीसाठा ५१५ मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याबाबत कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडे केली.       जागतिक बॅंकेने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी मंजूर झालेल्या निधीतून पायाभूत कामे प्राधान्याने करण्यात यावीत त्याबरोबरच यंदाच्या वर्षी येणा-या महापूराच्या नियंत्रण व उपाययोजनाबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी राजू शेट्टी यांनी अलमट्टी धरणातील पाणीसाठा वाढत गेल्यास हिप्परगी धरणात...

ज्येष्ठ साहित्यिक,अरण्यऋषीं मारुती चितमपल्ली यांनी घेतला अखेरचा श्वास.

Image
ज्येष्ठ साहित्यिक,  अरण्यऋषीं मारुती चितमपल्ली यांनी घेतला अखेरचा श्वास. निसर्गप्रेमी, पशुपक्ष्यांचा संगती हरपला . गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :- अरण्यऋषीं मारुती चितमपल्ली यांनी घेतला अखेरचा श्वास.मारुती चितमपल्ली यांचा जन्म 5 नोव्हेंबर  1932 साली झाला. यांनी 36 वर्षे  वनखात्यात सेवा केलीसंशोधक वृत्तीने भ्रमण केले त्यांनी पाच लाख कि.मी. प्रवास केला त्यांना 13 भाषेचे ज्ञान होते. आदिवासी व इतर जमातीशी संवाद साधत त्यांनी पर्यावरणाशी संबंधित मोठी माहिती मिळवली. त्या माहितीची नोंद केलेल्या आणि तीस वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीमधील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षी कोश प्राणी कोश मत्स्य कोशाचे लेखन पूर्ण केले. अरण्य वनसह प्राणी, पक्षी वनस्पतीची वैशिष्ट्यसह वन्यजीवन विषद करणारी अनेक पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली. निसर्गातील हा ठेवा समाजाला काळवा या भावनेतून सतत कार्यरत व सकारात्मक विचारांचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली.त्यांनी लिहलेली पुस्तके रानवाटा,केशरांचा पाऊस, निळावंती,नवेगावबांधचे दिवस,पक्षी जाय दिगंतरा, शब्दाच धन, चैत्र पालवी, रातवा,नि...

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन

Image
  जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले दर्शन. पुणे, दि. १८: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे आदी उपस्थित होते. दर्शनानंतर संस्थानच्यावतीने श्री.पवार यांचा सत्कार करण्यात आला. टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, 'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

संपूर्ण जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावे.___जिल्हाधिकारी संतोष पाटील

Image
  नागरिकांच्या शारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी 21 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावे. - जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा दि. 18:   शारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी योग नियमीत जीवनाचा भाग म्हणून स्वीकारला पाहिजे यासाठी येत्या 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात योगा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेली बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) धनंजय चोपडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व योग प्रशिक्षक उपस्थित होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत, विद्यालय, महाविद्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावे. योग दिन मोठ्या उत्साहात साजरा व्हावा यासाठी शा...

पोपट बनसोडे विद्यार्थ्यांना पुरवणार शैक्षणिक साहित्य.

Image
  पोपट बनसोडे विद्यार्थ्यांना पुरवणार शैक्षणिक साहित्य. शिराळा -प्रतिनिधी. खराळे पैकी,  खोतवाडी, काशीदवाडी, येथे पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांचा सत्कार व स्वागत शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी पोपट बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी  गावच्या सरपंच व स्थानिक पुढाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पहिली ते चौथीपर्यंत  शैक्षणिक साहित्य देण्यात आले  व  यापुढे खराऴे पैकी, खोतवाडी, काशीदवाडी, चिंचेवाडी, जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर आम्ही शैक्षणिक साहित्य पुरवणार आहोत अशी माहिती दिली.यावेळी उपस्थित शरद कोठावळे, गणेशभाऊ खोत,  प्रदीप खोत, पोपट बनसोडे, शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.

Image
  वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव येथे शाळा प्रवेशोत्सव  उत्साहात साजरा. शिराळा- प्रतिनिधी. वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये नवागतांचे स्वागत सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी विद्यालयांमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या इ.पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांचे  ढोल,पडघमच्या गजरात विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या जल्लोषात आगमन झाले. नवीन  विद्यार्थी,विद्यार्थिनीं यांच्या  चेहऱ्यावर आनंदाचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे नयनरम्य दृश्य डोळ्याचे पारणे फिटणारे होते. विद्यार्थी जगतात शाळेचा पहिला दिवस जीवनातील अविस्मरणीय घटना स्वर्ग सुखाचा आनंद द्विगुणित करणारी होती. विद्यालयात आगमनाप्रसंगी प्रारंभी  एस.एच. इंगवले  नवीन विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत केले. तसेच  विद्यालयाचे   मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते  प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.  महाराष्ट्र शासना कडून मिळालेली मोफत पाठ्यपुस्तकांचे मा.मुख्याध्यापक सदावर्ते सर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.  याप्रसंगी यु. आर नांग...

शिव केदार विद्यालय कांदे येथे नवागतांचे स्वागत.

Image
  शिव केदार विद्यालय कांदे येथे  नवागतांचे स्वागत. शिराळा -प्रतिनिधी. शिव केदार विद्यालय कांदे येथे नवागतांचे स्वागत जल्लोषात करण्यात आले.सोमवार दि.१६ जून २०२५ रोजी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा पहिला दिवस, नवागत विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्वागत गुलाब पुष्प देऊन केले, तसेच त्यांना नवीन शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.शाळेच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली.यावेळी उपस्थित मा. संजय पाटील, मुख्याध्यापक मा. अशोक भोईटे,मा. सौ. स्मिता पाटील,मा. सौ. सीतांजली जाधव,श्री. लहू कांबळे, श्री.आनंदा बंडगर, श्री.शैलेश चव्हाण, श्री अमोल सपाटे, त्याचबरोबर ग्रामस्थ,विद्यार्थी,विद्यार्थिनी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. वैशाली पाटील यांचा अहिल्यारत्न पुरस्कार २०२५ ने सन्मान.

Image
  डॉ. वैशाली पाटील यांचा अहिल्यारत्न पुरस्कार २०२५ ने सन्मान. उंंडाळे -प्रतिनिधी. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात मोठा सामाजिक, शैक्षणिक, उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना हा पुरस्कार दिला जातो. डॉ. पाटील यांनी नेहमी शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उठवून आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध करून दाखवली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

उत्तम शैक्षणिक सुविधा, चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Image
  उत्तम शैक्षणिक सुविधा, चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी                 - पालकमंत्री चंद्रकांत पाटील. - शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांना उपस्थिती - जि.प.शाळा बामणोली, मनपा शाळा क्र. 7 शाळेत उत्साह - विद्यार्थ्यांना पुष्प देऊन केले स्वागत   सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : शैक्षणिक वर्षारंभापासूनच विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी बाणवाव्यात. शिस्त, वेळेचे महत्त्व, पुस्तकवाचन, मैदानी खेळ, फटाक्यांना फाटा देऊन प्रदूषणास आळा व पर्यावरण संवर्धन, तंबाखू व अमली पदार्थ व्यसनापासून दूर राहणे यांचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवावे. उत्तम शैक्षणिक सुविधा व चांगले संस्कार यातून आदर्श भावी पिढी घडवावी, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.  शैक्षणिक वर्ष सन 2025-26 वर्षारंभ विद्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषद शाळा, बामणोली व सांगली मिरज कुपवाड महापालिका शाळा क्रमांक 7 सांगली येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य मान्यव...