अखेर जिल्हा प्रशासनाने केले नवे निर्देश जारी! नियमात केली शिथिलता.

 अखेर जिल्हा प्रशासनाने केले नवे निर्देश जारी! नियमात केली शिथिलता.

 नियमांचे पालन करून स्वतःची काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घेण्याचे केले अहवान.

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर पाचगणी या पर्यटन स्थळावर घालण्यात आलेली बंदी अखेर जिल्हा प्रशासनाने उठवली. सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावरील बंदी हटवली मात्र प्रशासनाने पर्यटकांना कडक निर्बंध घातलेले आहेत.

सातारा जिल्हा प्रशासनाचे नवे निर्देश.

1) पावसामुळे वेगाने वाहणा-या पाण्यात उतरणे व पोहणे.

2) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे,

3) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे धबधबे, द-यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढणेस व कोणत्याही स्वरुपाचे चित्रिकरण करणे.

4) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्यांचे परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे,

5) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.

6) वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल असे वेगाने चालविणे.

7) वाहनांची ने-आण करतांना बेदकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.

8) सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टीकचे साहित्या उघडयावर इतरत्र फेकणे.

9) सार्वजनिक ठिकाणी येणा-या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिल हावभाव करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.

10) सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डीजे सिस्टम वाजविणे, वाहनातील स्पिकर/उफर मोठ्या आवाजात वाजविणे यामुळे ध्वनी प्रदुषण करणे.

11) ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल असे कोणतीही कृती करणे.

12) धबधबे, धरणे व नदी आदी परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करणे (अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळून)

ही मार्गदर्शक आचारसंहिता ही पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी असून पर्यटनाचा आनंद घेत असताना कोणतीही दुखापत इजा होणार नाही अथवा पर्यटन जीवावर बेतणार नाही, याची दक्षता घ्या, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .