कागल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु.
कागल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु.
कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, कसबा सांगाव रोड, कागल या वसतिगृहात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
प्रवेशासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, कसबा सांगाव रोड, कागल या वसतिगृहास संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांनी केले.
इयता 7 वी च्यापुढे विद्यालयीन, महाविद्यालयीन व व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण घेणा-या गरजू विद्यार्थ्यांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती / विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील रिक्त जागांवर विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, जेवण, राहण्याची सोय, सुसज्ज ग्रंथालय, सभागृह, क्रिडांगण, संगणक कक्ष, मनोरंजन कक्ष, जिम व विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, गणवेश भत्ता, सहल भत्ता व स्टेशनरी भत्ता इत्यादी सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, कसबा सांगाव रोड, कागल या वसतिगृहास किंवा भ्रमणध्वनी क्र. 9403233217 या व्दारे संपर्क साधावा.

Comments
Post a Comment