रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा.

 रुग्ण सेवा हीच  ईश्वर सेवा. 

_______ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

गोंडवाना न्युज ब्युरो रिपोर्ट :-

रुग्ण सेवा ही  ईश्वर सेवा असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुगणालय मदत कक्षातील सर्वांनी गतिशीलता, पारदर्शकता आणि संवेदशनशीलतेने काम करुन समाजातील प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी  प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण तथा संशोधन अकादमी (मित्रा) नाशिक येथे आयोजित मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील जिल्हास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप  प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार ॲड. राहुल ढिकले, पोलीस उपमहानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .