वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागाव येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.
शिराळा- प्रतिनिधी.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये नवागतांचे स्वागत सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी विद्यालयांमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या इ.पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांचे ढोल,पडघमच्या गजरात विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या जल्लोषात आगमन झाले.नवीन विद्यार्थी,विद्यार्थिनीं यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे नयनरम्य दृश्य डोळ्याचे पारणे फिटणारे होते. विद्यार्थी जगतात शाळेचा पहिला दिवस जीवनातील अविस्मरणीय घटना स्वर्ग सुखाचा आनंद द्विगुणित करणारी होती. विद्यालयात आगमनाप्रसंगी प्रारंभी एस.एच. इंगवले नवीन विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत केले.तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक ,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र शासना कडून मिळालेली मोफत पाठ्यपुस्तकांचे मा.मुख्याध्यापक सदावर्ते सर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याप्रसंगी यु. आर नांगरे मॅडम यांनी शाळा म्हणजे विद्यामंदिर आहे विद्यालयात विद्यार्थी विकास सोयी सुविधा माहिती दिली.सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक, शिक्षिकांनी शुभेच्छा दिल्या.नवीन शाळा, नवे शिक्षक शिक्षिका , नवीन शिक्षण यातून जीवनात गगनभरारी घ्यावी असा संदेश दिला.
मा. मुख्याध्यापक अरविंद सदावर्ते सरांनी प्रवेशोत्सव का साजरा करावा ? याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
वर्गाची सजावट फुगे लावून व रांगोळी काढून केली होती.शैक्षणिक वर्ष 2025 -2026 शालेय वर्षारंभ चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला . याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. श्री.व्ही. डी. पाटील यांनी आभार मानले व सचिन पाटील सर यांनी सूत्रसंचलन केले.

Comments
Post a Comment