मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे मातंग समाजाच्या मागण्याबाबत बैठक.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे मातंग समाजाच्या मागण्याबाबत बैठक. 

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे मातंग समाजाच्या मागण्याबाबत बैठक झाली. यावेळी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री दिलीप कांबळे, आमदार सर्वश्री सुनील कांबळे, नामदेव ससाने, अमित गोरखे, जितेश अंतापुरकर, माजी आमदार सर्वश्री अविनाश घाटे,  रामभाऊ गुंडिले, तसेच मातंग समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करीत आहे. मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. बार्टीच्या धर्तीवर ‘आर्टी’ संस्थेचे सक्षमीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. 

अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरणासाठी निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापली असून समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची विनंती केली जाणार आहे. अहवालात आपल्या मागण्या समाविष्ट करण्यासाठी मातंग समाज संघटनांनी आपल्या मागण्या लेखी स्वरूपात बदर समितीकडे सादर कराव्यात – मुख्यमंत्री

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .