जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलापूर विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण.

 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलापूर विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण.

सोलापूर - प्रतिनिधी.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन विस्तारीत परिसरात जागतिक पर्यावरण दिन ५ जून २०२५ निमित्ताने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने कृतीशील पाऊल उचलण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन भूशास्त्र संकुलातील पर्यावरणशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि विद्यापीठ पर्यावरण संरक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्र कुलगुरु प्रा. डॉ. लक्ष्मिकांत दामा, मा. प्र.कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना डॉ. लक्ष्मिकांत दामा यांनी सांगितले की, "झाडे लावणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, पाण्याचा अपव्यय थांबवणे या छोट्या छोट्या कृतीतून आपण पर्यावरण रक्षण करू शकतो. हीच जबाबदारी आपल्या सर्वांची आहे."

यावेळी डॉ. श्रीकांत अंधारे, सीए डॉ. महादेव खराडे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, डॉ.सचिन गायकवाड, सिनेट सदस्य प्रा. डॉ. जैनुद्दीन मुल्ला, श्री. सिद्धेश्वर स्वामी, श्री. मनोज देवकर, प्रा. रश्मी माने, पर्यावरण संरक्षण समितीचे सदस्य, विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृक्षारोपणासाठी नारळ, आंबा, चिक्कू, चिंच, वड, पिंपळ, कडूलिंब, करंज, महोगनी इत्यादी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. राजेंद्र वडजे (संचालक, राष्ट्रीय सेवा योजना) आणि डॉ. विनायक धुळप (संचालक, भूशास्त्र संकुल) यांनी विशेष योगदान दिले. विद्यार्थ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य हे कार्यक्रमाच्या यशाचे मुख्य कारण ठरले.

सदर उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणासाठी सकारात्मक बांधिलकी विकसित होईल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.


सोलापूर :- जागतिक पर्यावरण दिन २०२५ निमित्त वृक्षारोपण करताना मा. प्र कुलगुरु प्रा. डॉ. लक्ष्मिकांत दामा, प्र. कुलसचिव डॉ. अतुल लकडे, डॉ. देवानंद चिलवंत, डॉ. सचिन गायकवाड, डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. विनायक धुळप व इतर मान्यवर.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .