नुने ता. पाटण वि. का. से. सो. पंचवार्षिक निवडणूकीत मम्हादेवी केदारेश्वर शेतकरी विकास पॅनलचा विजय.

नुने ता. पाटण वि. का. से. सो. पंचवार्षिक निवडणूकीत मम्हादेवी केदारेश्वर शेतकरी विकास पॅनलचा विजय.

पाटण- प्रतिनिधी.

नुने ता. पाटण वि. का. से. सो. पंचवार्षिक निवडणूकीत मम्हादेवी केदारेश्वर शेतकरी विकास पॅनलचा विजय मिळवला. पाटण येथील कोयना दौलत निवासस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई यांची नुने विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झालेल्या मम्हादेवी केदारेश्वर शेतकरी विकास पॅनलमधील सर्व नवनिर्वाचित संचालकांनी आणि नुने ग्रामस्थांनी भेट घेतली. 

या वेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा) यांचीही भेट झाली. सर्व विजयी संचालकांचे आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना एकच गोष्ट सांगितली नुने गावाने पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेचा भगवा झेंडा सोसायटीवर फडकवला आहे. संपूर्ण पॅनलने १२-० असा धडाकेबाज विजय मिळवून पाटण तालुक्यात अभिमानाची निशाणी निर्माण केली आहे.हा विजय केवळ निवडणुकीचा नाही, तर नुने गावाच्या एकजुटीचा, विकासाच्या इच्छाशक्तीचा आणि शिवसेनेवरच्या विश्वासाचा आहे.गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी पालकमंत्री म्हणून आणि एक सेवक म्हणून सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि राहीन, याचा मी शब्द देतो. अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या 



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .