फकीरा पॅंथर सेनेचा आंदोलनाचा इशारा.

 फकीरा पॅंथर सेनेचा आंदोलनाचा इशारा. 

कराड तहसील कार्यालयासमोर करणार आंदोलन. 


कराड - प्रतिनिधी.

फकीरा पँथर सेना प्रदेशाध्यक्ष मा. अनिकेतभाऊ साळुंखे यांनी फकीरा पॅंथर सेनेच्या वतीने कराड तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे . हे आंदोलन 13/06/2025 रोजी तहसीलदार कार्यालय कराड येथे करण्यासंदर्भात माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली.कराड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार  नागरिकांना शासकीय नियमानुसार धान्य वाटप करत नाहीत, धान्य वितरण केले ची पावती देत नाहीत, तक्रार बुक उपलब्ध नसते, प्रत्येक रेशन कार्ड धारकाकडून दोन किलो धान्य घेतले जाते अशी माहिती फकीरा पॅंथर सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा. अनिकेतभाऊ साळुंखे यांना मिळाल्यावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता आमच्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून पगार येत नसल्याने आम्ही दोन किलो धान्य घेत आहोत अशी माहिती मिळाली यावर ही बाब मा. अनिकेतभाऊ साळुंखे यांनी निवेदनाद्वारे कराड तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिले व संबंधित दुकानदारांच्यावर कारवाई होऊन त्यांचे परवाने रद्द व्हावेत या मागणीसाठी फकीरा पॅंथर सेना शुक्रवारी 13/06/2025 रोजी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे अशी माहिती फकीरा त्यानंतर सेनेने आपल्या निवेदनाद्वारे दिली.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .