कराड दक्षिण भाजपच्यावतीने मलकापूर नगरपरिषदेस निवेदन.
कराड दक्षिण भाजपच्यावतीने मलकापूर नगरपरिषदेस निवेदन.
कराड - प्रतिनिधी.
मलकापूर नगरपरिषद कार्यक्षेत्रातील मिळकत धारकांना मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफीसाठी अभय योजना लागू करण्याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डाॅ.अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कराड दक्षिण मंडलाच्यावतीने मुख्याधिकारी प्रताप कोळी यांना निवेदन देण्यात आले यावेळी मंडल मध्य मंडल अध्यक्ष राजेंद्र यादव, मा. विरोधीपक्षनेते हणमंतराव जाधव, तानाजी देशमुख,भारत जंञे,सुरज शेवाळे, नगरसेवक शहाजी पाटील, दिनेश रैनाक,राजू मुल्ला,प्रशांत चांदे, कान्हा लाखे, प्रशांत गावडे, सुर्यकांत खिलारे, संतोष हिंगसे, नंदकुमार बागल,विजेंद्र जाधव,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका नगरपरिषदा व नगरपंचायत क्षेत्रामध्ये अनेकवेळा मालमत्ता कराची थकबाकी ची रक्कम जास्त असणे, मालमत्ता धारकांची आर्थिक अडचण असणे, या व इतर कारणांमुळे मालमत्ता कराचा भरणा करण्यात येत नाही. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 150 (अ) (1) नुसार बिलाच्या न भरलेल्या रकमेवर संबंधित नगरपरिषद/ नगरपंचायत यांचेकडून दरमहा 2% शास्ती (दंड) लावण्यात आलेले आहे. यामुळे मालमत्ता धारकाच्या एकूण थकबाकीमध्ये वाढ होऊन याचा विपरीत परिणाम करवसुलीवर होतो. यावर उपाययोजना म्हणून नगरपरिषदा क्षेत्रातील थकित मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफ करुन कर वसुल करण्यासाठी प्रोत्साहान मिळण्याच्या दृष्टीने अभय योजना लागू करण्याबाबत शासनस्तरावर विचार करण्यात आला आहे.
त्यानुसार नगरपालिका / नगरपरिषद व नगरपंचायती क्षेत्रातील मिळकत धारकांकरिता दि. 19/05/2025 रोजी महाराष्ट्र शासनाने मालमत्ता करावरील शास्ती (दंड) माफ करणेकामी अभय योजना प्रोत्साहनात्मक राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर योजनेमध्ये दि. 19/05/2025 रोजी ज्या थकित मिळकतधारकांची शास्ती(दंड) थकबाकी आहे, अशा मिळकतधारकास महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती अधिनियम 1965 चे कलम 150 (क) नुसार नगरपरिषद मालमत्ता करावरील शास्ती (दंड) अंशतः / पूर्णतः माफ करणे आवश्यक आहे.तरी वरील सर्व बाबींचा विचारकरिता मलकापूर नगरपरिषद कार्यक्षेत्रामधील मिळकत धारकांच्या थकित मालमत्ता करावर आकारण्यात आलेली शास्तीची रक्कम माफ होणेसाठी मलकापूर नगरपरिषदेच्या स्तरावरील नागरिकांच्या सोईसाठी व्यापक प्रसिध्दी देण्यात येऊन व वर्तमानपत्र व जाहिरात तसेच बोर्ड लावून नागरिकांना आवाहन करावे त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होणेस आम्ही विनंती करीत असे निवेदनात म्हटले आहे यावेळी कार्यकर्त्यांसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment