कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्वल यश.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्वल यश.
उंडाळे -प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२५ पदविका औषध निर्माणशास्त्र (डी. फार्म) प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव, ता. कराड या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश संपादन केले आहे.
त्यामध्ये प्रथम वर्षाचा निकाल ७८ टक्के लागला असून वैभवी रवींद्र वरगुंटे हिने ८०.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर श्वेता तुलसीदास लोहार हिने ७६.१० टक्के गुणासह द्वितीय क्रमांक तर अस्मिता दिनकर महानवार हिने ७५.७० टक्के गुणासह तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच द्वितीय वर्षाचा निकाल ९१ टक्के लागला असून आदित्यराज दीपक कुंभार याने ७९.३६ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक, प्रियांका संजय काकडे ७८.९१ टक्के गुणासह द्वितीय क्रमांक व मयुरी रमेश मस्कर ७८.०९ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.
या यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांची इच्छा व्यक्त करताना हे महाविद्यालय एनबीए मान्यताप्राप्त असून ते महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकाचे व सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे महाविद्यालय असून या महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा व अनुभवी शिक्षक वर्ग यामुळेच आम्ही या यशापर्यंत पोहोचलो असल्याचे सांगितले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Comments
Post a Comment