कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्हमध्ये निवड.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॅम्पस ड्राईव्हमध्ये निवड.
उंडाळे -प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण झाल्यावर उत्तम नोकरी मिळावी यासाठी महाविद्यालय सतत कार्यरत असते त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाने आयोजित केलेल्या झायडस लाईफसायन्स लि. गोवा कॅम्पस ड्राईव्हमध्ये महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये प्रणय लोटळे, आदित्य कुचेकर, हरीश काळे, आदित्य कुंभार, धीरज पवार, बालाजी जगताप, तुषार साठे या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या निवडी करण्यासाठी झायडस लाईफसायन्स लि. चे एच आर राम पाटील, विक्रांत कदम, गजेंद्र वेर्णेकर हे उपस्थित होते. यावेळी निवड करण्यासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन ट्रेनिंग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. पूजा भोसले यांनी केले.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Comments
Post a Comment