कृष्णा विश्व विद्यापीठाचा आज १३ वा दीक्षांत सोहळा संपन्न झाला.

 कृष्णा विश्व विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत सोहळा संपन्न झाला.

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:-

कृष्णा विश्व विद्यापीठाचा  १३ वा दीक्षांत सोहळा ३ जून रोजी संपन्न झाला. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिले. कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत प्रेरणादायी वातावरणात हा सोहळा पार पडला. 

१९८२ साली सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्ट आरोग्य शिक्षण मिळावे, या दृष्टीने कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राची स्थापना केली. त्या दूरदृष्टीतूनच पुढे अनेक संस्था निर्माण झाल्या आणि २००५ साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. स्व. आप्पासाहेबांच्या स्वप्नांची ही साकार प्रतिकृती होती.

आज कृष्णा विद्यापीठाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली खास ओळख निर्माण केली आहे, याचा मला मनस्वी अभिमान वाटतो. या वर्षीच्या दीक्षांत समारंभात सहभागी होताना, माझ्या स्वतःच्या पदवीप्राप्तीचा दिवस मला आठवला. तो शिस्तीचा काळ, अभ्यासाची तळमळ, स्वप्नांची चमक आणि त्या प्रवासातील समर्पण! आज मी या मंचावर एक माजी विद्यार्थी, एक लोकप्रतिनिधी आणि संस्थेचा सदस्य म्हणून उभा असताना मन अभिमानाने भरून आलं.

स्व. आप्पासाहेबांनी सुरू केलेल्या या प्रवासाने आज एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यंदाच्या दीक्षांत सोहळ्यात वैद्यकीय, नर्सिंग, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी, सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, आणि फार्मसी या सहा शाखांमधील १,०६२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यातील २५ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

या यशामागे आप्पासाहेबांचे विचार शिकवण, कुलपतींची दूरदृष्टी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची शिस्त आणि हजारो शिक्षक व कर्मचाऱ्यांचे योगदान आहे.

आजचे कृष्णा विद्यापीठ ही केवळ एक शैक्षणिक संस्था नसून, ग्रामीण भारतासाठी एक आशेचा किरण, गुणवत्ता व सेवाभावाने भरलेले उज्वल भविष्य घडवणारी संस्था आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .