शिराळा तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांची चौकशी व्हावी. ___ॲड. रवी पाटील.
शिराळा तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांची चौकशी व्हावी. ___ॲड. रवी पाटील.
शिराळा -प्रतिनिधी.
दलित वस्ती सुधार योजनेतील शिराळा तालुक्यातील विविध कामे विविध ठिकाणी झाली आहेत त्यांची चौकशी व्हावी. अन्यथा शिराळा तालुक्यातील सर्व संघटना एकत्र तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती. कॉंग्रेस आय कमेटी शिराळा तालुका अध्यक्ष ॲड. रवी पाटील यांनी दिली.चिंचोली ता.शिराळा येथील बौद्ध समाज बांधवांचे वारणा कॅनॉल मुळे पुनर्वसन झाले आहे. पांडुरंग घोलप ते विश्वास घोलप यांच्या घरामागील संरक्षण भिंत दोन वर्षो पुर्वी अती पावसाने पडलेली आहे त्या संरक्षण भिंतीची मंजुरी मिळावी म्हणून दि 10/12/24रोजी मे.तहसीलदार सो शिराळा यांना निवेदन दिले होते. दलित वस्ती सुधार योजनेतील संरक्षण भिंत व सामाजिक सभागृह या कामांना तीन वर्षापासून मंजुरी मिळत नाही.अनेक गावात सामाजिक सभागृह नाहीत संरक्षण भिंतीची आवश्यकता असताना शासन या कामांना निधी देत नाही. त्यामुळे शिराळा तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेतील कामांची चौकशी व्हावी व इतर ठिकाणी होणाऱी कामे त्वरित थांबवावी या मागणी साठी मा गटविकास अधिकारी वर्ग 1यांना दि 19/6/2025रोजी निवेदन दिले आहे तरी त्वरित कामांची चौकशी न झाल्यास मोठे आंदोलन उभारणार असल्याचे ॲड. रवि पाटील यांनी सांगितले

Comments
Post a Comment