पोपट बनसोडे विद्यार्थ्यांना पुरवणार शैक्षणिक साहित्य.
पोपट बनसोडे विद्यार्थ्यांना पुरवणार शैक्षणिक साहित्य.
शिराळा -प्रतिनिधी.
खराळे पैकी, खोतवाडी, काशीदवाडी, येथे पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांचा सत्कार व स्वागत शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी पोपट बनसोडे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी गावच्या सरपंच व स्थानिक पुढाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पहिली ते चौथीपर्यंत शैक्षणिक साहित्य देण्यात आले व यापुढे खराऴे पैकी, खोतवाडी, काशीदवाडी, चिंचेवाडी, जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर आम्ही शैक्षणिक साहित्य पुरवणार आहोत अशी माहिती दिली.यावेळी उपस्थित शरद कोठावळे, गणेशभाऊ खोत, प्रदीप खोत, पोपट बनसोडे, शाळेचे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments
Post a Comment