डॉ. वैशाली पाटील यांचा अहिल्यारत्न पुरस्कार २०२५ ने सन्मान.

 डॉ. वैशाली पाटील यांचा अहिल्यारत्न पुरस्कार २०२५ ने सन्मान.

उंंडाळे -प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात मोठा सामाजिक, शैक्षणिक, उद्योग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना हा पुरस्कार दिला जातो. डॉ. पाटील यांनी नेहमी शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उठवून आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध करून दाखवली आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .