महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे जिल्हा समाज कल्याण कार्यालयाचे आवाहन.

 महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे जिल्हा समाज कल्याण कार्यालयाचे आवाहन.


सातारा, दि.१३ (जि.मा.का.):शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती शिक्षण, परिक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसाईक पाठ्यक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेचे अनुसूचित जाती प्रवर्गातील महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नुतनीकरण  व नवीन अर्ज नोंदणी महाविद्यालयाने शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार तसेच योजनेच्या निकषांनुसार पडताळणी करून मंजूर करावयाचे आहेत. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता महाडीबीटी प्रणालीवरील नवीन व नुतनीकरणाचे अर्ज नोंदणीस दिनांक-१५ जून, २०२५ पासून सुरूवात होणार आहे. सातारा जिल्ह्यातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसायिक, बिगर व्यावसायिक, तांत्रिक या सर्व महाविद्यालयांनी, अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसाईक पाठ्यक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता या सर्व योजनांचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज भरण्याची सुविधा आपल्या महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्रामध्ये उपलब्ध करून द्यावी. पात्र व परिपूर्ण भरलेले अर्ज संबधीत महाविद्यालयांनी समाज कल्याण विभागाकडे शिष्यवृत्ती मिळणेकामी तात्काळ सादर करायचे असून महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित ठेवू नयेत, असे आवाहन मा. श्री. सुनिल जाधव, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .