वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती संपन्न.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती संपन्न.
वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सागांव मध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती समारंभ संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्रीमती ए. आर. पाटील. यांनी केले.कार्यक्रम अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अरविंद सदावर्ते होते.अध्यक्षांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच यावेळी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली व अंमली पदार्थ विरोधी उद्बोधन केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी आर्या घागरे,आराध्या घागरे,समर्थ बादरे यांनी भाषणे केली. विद्यालयातील श्री.बी.एम.नलवडे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनचरित्र याविषयी माहिती दिली.कार्यक्रम अध्यक्षांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उदार व उदात्त कार्याचा आढावा घेतला. भाषण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे देऊन गौरव केला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. व्ही.डी. पाटील यांनी केले.तर सूत्रसंचालन श्री.एस. एच. इंगवले यांनी केले.

Comments
Post a Comment