ज्येष्ठ साहित्यिक,अरण्यऋषीं मारुती चितमपल्ली यांनी घेतला अखेरचा श्वास.

ज्येष्ठ साहित्यिक, अरण्यऋषीं मारुती चितमपल्ली यांनी घेतला अखेरचा श्वास.

निसर्गप्रेमी, पशुपक्ष्यांचा संगती हरपला .

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-

अरण्यऋषीं मारुती चितमपल्ली यांनी घेतला अखेरचा श्वास.मारुती चितमपल्ली यांचा जन्म 5 नोव्हेंबर  1932 साली झाला. यांनी 36 वर्षे  वनखात्यात सेवा केलीसंशोधक वृत्तीने भ्रमण केले त्यांनी पाच लाख कि.मी. प्रवास केला त्यांना 13 भाषेचे ज्ञान होते. आदिवासी व इतर जमातीशी संवाद साधत त्यांनी पर्यावरणाशी संबंधित मोठी माहिती मिळवली. त्या माहितीची नोंद केलेल्या आणि तीस वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या आहेत. डायरीमधील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षी कोश प्राणी कोश मत्स्य कोशाचे लेखन पूर्ण केले. अरण्य वनसह प्राणी, पक्षी वनस्पतीची वैशिष्ट्यसह वन्यजीवन विषद करणारी अनेक पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली. निसर्गातील हा ठेवा समाजाला काळवा या भावनेतून सतत कार्यरत व सकारात्मक विचारांचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली.त्यांनी लिहलेली पुस्तके रानवाटा,केशरांचा पाऊस, निळावंती,नवेगावबांधचे दिवस,पक्षी जाय दिगंतरा, शब्दाच धन, चैत्र पालवी, रातवा,निसर्गवाचन, पाखर माया, जंगलाचे देणे, जंगलाची दुनिया.घरट्या पलीकडे, सुवर्णंगरुड. या साहित्यामुळे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली हे सदैव स्मरणात राहतील.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .