श्री. कोटेश्वर विद्यालय गोवे येथे विविध उपक्रम साजरे.

 श्री. कोटेश्वर विद्यालय गोवे येथे  विविध उपक्रम साजरे.

सातारा - प्रतिनिधी.

गोवे ता.सातारा येथे श्री.कोटेश्वर विद्यालय व ज्यु.कॉलेज गोवे तसेच प्राथमिक शाळा गोवे यांनी वारकरी दिंडी चे आयोजन केले होते.यावेळी सर्व विद्यार्थी वारकरी वेशभूषेत आले होते मुलींनी नऊवारी साडी ,डोक्यावर तुळस ,गळ्यात टाळ वेशभूषा केली होती.अखंड हरिनाम यामुळे सर्व वातावरण भक्तिमय झाले होते.विद्यार्थी विविध संतांच्या वेशभूषेत आले होते.वारकरी दिंडीत विद्यार्थी ग्रंथवाचन व वृक्षारोपण करण्याच्या घोषणा देऊन जनजागृती करत होते.

विद्यालयाने या आधी शाळा प्रवेशोस्तव ,मोफत पुस्तक वाटप सायकल वरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी स्व.एकनाथ जगताप फाऊंडेशन सासवड व परिवर्तन संस्था पुणे यांच्या माध्यमातून हेल्मेट वाटप.ग्रंथ प्रदर्शन ,प्रयोगशाळा साहित्य प्रदर्शन ,AI लॅब ओळख, छत्रपती शाहू महाराज जयंती वक्तृत्व स्पर्धा,शिक्षक पालक सभा,माता पालक सभा इ.उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या सर्व कार्यक्रमांसाठी संस्थेचे अध्यक्ष ,सचिव ,सर्व संचालक मंडळ ,पालक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .