आर्थिक साक्षरतेसाठी विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करणे अपरिहार्य - डॉ. मारुती सूर्यवंशी.
आर्थिक साक्षरतेसाठी विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करणे अपरिहार्य - डॉ. मारुती सूर्यवंशी. कराड - प्रतिनिधी. श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग व वाणिज्य विभागाच्या वतीने आयोजित केंद्रीय अर्थसंकल्प 2026 27 या परिसंवादात मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख साधन व्यक्ती डॉ. मारुती सूर्यवंशी कार्यक्रमाचे प्रमुख साधन व्यक्ती म्हणून बोलताना, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मारुती सूर्यवंशी - म्हणाले की, या अर्थसंकल्पामध्ये सरकारने विशेष करून संरक्षणावरती मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे व देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबरोबरच देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिलेली दिसून येते. तसेच अधिक रोजगार निर्मिती व्हावी ग्रामीण भागाचा विकास व्हावा याकरिता सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगाच्या विकासाला चालना देण्यासाठी 10 हजार कोटी रु. ची सरकारने तरतूद केलेली दिसून येते. थोडक्यात या अर्थसंकल्पामध्ये सरकारने आर्थिक विकासाची गती...