विशेष श्रम संस्कार शिबिरातूनच मिळते विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली:- प्राचार्य शशिकांत काटे.


विशेष श्रम संस्कार शिबिरातूनच मिळते विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली:- प्राचार्य शशिकांत काटे.

 कराड - प्रतिनिधी.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था संचलित शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड व ग्रामपंचायत मौजे कालवडे येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर 3 जानेवारी ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत उत्साहात संपन्न झाले. शिबिराच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य शशिकांत काटे सातारा जिल्हा विभाग प्रमुख, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर हे  होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, विशेष श्रम संस्कार शिबिरातूनच मिळते विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची गुरुकिल्ली. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रमदानाचे संस्कार तर होतातच, परंतु विविध प्रबोधन पर कार्यक्रमातून ज्ञानविज्ञानाची ही ओळख होते. शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे आपल्या सर्वांना विचारविश्व दिले. शिबिरामध्ये देखील विद्यार्थी ज्ञान विज्ञान तर घेतातच परंतु श्रम संस्काराचे धडे देखील गिरवतात. ग्रामीण भागात अशा श्रमसंस्कार शिबिरातून अनेक विकास कामे करता येतात. ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, रस्ता दुरुस्ती, वनराई बंधारे अशी अनेक कामे केली जातात. त्यामुळे गावचा विकास होण्यास मदत होते.

                   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, या सात दिवसांमध्ये सर्व स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अत्यंत चांगले श्रमदानंतर केलेच आहे. परंतु सर्वेक्षणासारखे ग्रामपूरक कार्यक्रम देखील हाती घेतले व पूर्ण केले. हे अभिमान स्पद आहे. राष्ट्रीय सेवा योजना हेच खऱ्या अर्थाने विद्यार्थी जीवन फुलवण्याचे व्यासपीठ आहे.

                 या समारोप प्रसंगी कालवडे गावचे प्रथम नागरिक माननीय सरपंच सुदाम मोठे उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य मा. बालिश थोरात, ग्रामपंचायत सदस्य सौ गीतांजली थोरात यांनी आपली मनोगते व्यक्त केली. काही शिबिरार्थी विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी केले. आभार ग्रामपंचायत सदस्य बालिश थोरात यांनी व्यक्त केले. तर सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड यांनी केले. या समारोपासाठी कालवडे गावातील विविध पदाधिकारी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सर्व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. रघुनाथ गवळी, प्रा. अण्णासाहेब पाटील व सदस्य, स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .