स्वा.सै.शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा.
स्वा.सै.शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा.
उंडाळे - प्रतिनिधी.
6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात 'मराठी पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो. याच कारण म्हणजे, बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 ला 'दर्पण' हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू करून, मराठी पत्रकारितेचा पाया घातला. बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान मराठी पत्रकारिता आणि समाज सुधारणेत अमूल्य आहे.
मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या ६ जानेवारी रोजीच्या जयंतीनिमित्त स्वा.सै.शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि शाल, श्रीफळ गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

Comments
Post a Comment