टाळगाव येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न.

 टाळगाव येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न.

 उंडाळे - प्रतिनिधी.

मौजे टाळगाव, ता.कराड येथे कराड दक्षिणचे आश्वासक  आमदार मा.श्री.अतुलबाबा भोसले  यांच्या आमदार निधीतून व जनसुविधा सन २०२५-२६ अंतर्गत मंजुर झालेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम  संपन्न झाला. टाळगाव येथे अंतर्गत रस्ता सुधारणा करणे, आण्णाभाऊ साठेनगर मध्ये आर सी.सी.गटर बांधणे. मौजे टाळगाव येथील भैरवनाथ मंदिर परिसर पेव्हर ब्लॉक बसवणे.मौजे शेवाळेवाडी, टाळगाव येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे.

        या  मंजुर विकासकामांचे भुमीपूजन मा. श्री.दयानंद पाटील माजी व्हाइस चेअरमन व विद्यमान संचालक य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना लि.शिवनगर, सवादे गावचे माजी सरपंच मा. श्री.संजयराव शेवाळे ,श्री.पंकजराव पाटील विद्यमान उपाध्यक्ष सोशल मिडीया भाजपा सातारा,श्री.हणमंतराव थोरात, श्री.प्रविण साळुंखे विद्यमान अध्यक्ष पश्चिम - दक्षिण कराड मंडल भाजपा, श्री.अक्षय शेटे चेअरमन येळगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड येळगाव, श्री.सचिन बागट कामगार केसरी, श्री.संदिपराव भावके, श्री.महिंदकर पेंटर या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते व टाळगाव गावचे सुपुत्र श्री.जयवंत जाधव ,श्री.ॲड.बळवंत पाटील मुंबई हायकोर्ट, श्री.मोहनराव शेवाळे आप्पा, श्री जगन्नाथ कोल्हे , श्री.सागर शेवाळे, श्री.अनिलराव सपकाळ दादा, श्री.प्रकाश पाटील आबा, श्री.प्रा.के.एन.जाधव , श्री.श्रीरंग जाधव ,श्री.बाळासाहेब जाधव , श्री.प्रतापराव कारंडे आप्पा,श्री.सुरेश कदम, श्री.विजयराव जाधव,  श्री.दत्तात्रय जाधव बापू, श्री.विनोद पाटील , श्री.सागर जाधव,श्री.दिलीप पाटील, श्री.मारुती जाधव , श्री.विश्वास पाटील, श्री.सुनिल सपकाळ, श्री.रविंद्र सपकाळ, श्री.वैभव जाधव, श्री.शुभम कारंडे यांचे समवेत श्री.धनंजय देशमुख यांचे उपस्थितीत संपन्न झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मयुर जाधव यांनी केले.सवादे गावचे सुपुत्र श्री.संजय शेवाळे दादा, श्री.पंकजराव पाटील, श्री.ॲड.बळवंत पाटील,श्री.प्रा.के.एन.जाधव सर,श्री‌.अनिलराव सपकाळ,  श्री सागर जाधव, श्री.धनंजय देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.श्री.विनोद पाटील  यांनी आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .