कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयाची विविध ठिकाणी क्षेत्र भेट

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयाची विविध ठिकाणी क्षेत्र भेट

उंडाळे-प्रतिनिधी.

श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच अभ्यासक्रमातील इतर प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे व अभ्यासक्रमांमध्ये अधिक ज्ञान तसेच आवड निर्माण होण्याकरिता  विविध ठिकाणांच्या  क्षेत्र भेटींचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मलकापूर येथील गणेश एजन्सीचे वितरक अजय भट्टड यांनी विद्यार्थ्यांना बिलिंग कसे करावे, उत्पादनांच्या याद्या कशा हाताळाव्या, अकाउंटिंग कसे करावे, मुदत संपलेल्या वस्तू कशा ओळखाव्या या विषयी मार्गदर्शन केले. ओंड येथील गणेश हॉस्पिटल येथे आयसीयू कसे असते, एक्स-रे कसा काढायचा याविषयी माहिती देण्यात आली तर श्री लॅबोरेटरी उंडाळे येथे हॉट ऑटो एअर  ओव्हन, ऑटोक्लेव्ह, सेंट्री फ्युगेशन मशीन याविषयी माहिती देण्यात आली.यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयश्री जगदाळे व  नम्रता रणपिसे यांनी द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी या भेटींचे आयोजन केले होते. 





Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .