कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश.
कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश.
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी रॉमन्स बायोलाईफ लि. ठाणे यांच्यावतीने जेनेसीस इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, राधानगरी (कोल्हापूर) येथे घेण्यात आलेल्या पोस्टर व मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
सायली गिरीगोसावी व अस्मिता बावडेकर यांनी मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी वर्किंग मॉडेल ऑफ पॅथोफिजिओलॉजी अँड फार्माकोलॉजीकल ॲक्शन ऑफ कारडिओटोनिक्स या विषयावरती मॉडेलचे सादरीकरण केले होते. तर दिक्षा साबळे व धनश्री नाईक या विद्यार्थिनींनी पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्यांनी मॉडर्न इन्वोशन इन ड्रग डिलिवरी टेक्नॉलॉजी या विषयावरती पोस्टर प्रेसेंटेशन केले होते. त्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थिनींना मार्गदर्शन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व प्रा. मोनिका शिंदे यांनी केले. त्यांच्या समवेत प्राध्यापिका तेजस्वी कांबळे या उपस्थितीत होत्या.
या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसुन जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Comments
Post a Comment