महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यांविरोधात रासुका अंतर्गत कारवाई करण्यात यावी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्यांविरोधात रासुका अंतर्गत कारवाई करण्यात यावी _____ उत्तरेश्वर कांबळे.
सोलापूर - प्रतिनिधी.
देशाचीच नव्हे तर जगाची अस्मिता असलेले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जातीयवादी मनुवादी आठ ते दहा लोकांनी पोस्टर ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) या ठिकाणी जाळून, पायाखाली चिरडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे, हे संतापजनक कृत्य केले असून यामुळे समस्त आंबेडकरी समाजातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. यामुळे देशभरात याचे तीव्र पडसाद उमटून कायदा व सुवस्था बिघडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सदर प्रकार करणाऱ्या मनुवादी अनिल मिश्रा, मोहित ऋषिश्वर ऊर्फ मोहित शर्मा, अमित दुबे, ध्यानेंद्र शर्मा, कुलदीप कांकेरिया, अमित भदौरिया, गौरव व्यास या जातीयवादी लोकांवर रासुका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी यावी अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक दल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे रासुका अंतर्गत कारवाई न झाल्यास भीम आर्मी स्टाईलने देशभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनाच्या शेवटी कांबळे यांनी दिला आहे.यावेळी बलभीम कांबळे ,राहुल कांबळे ,सनी कांबळे आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment