कराड येथे बालकांचे मोफत शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

 कराड येथे बालकांचे मोफत शस्त्रक्रिया शिबीर संपन्न 


कराड :- शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. प्रशांत देसाई, डॉ. पारस कोठारी, डॉ. शेखर कोगनुळकर, डॉ. वैशाली चिंचकर, मंगल जानकर. आदी.

कराड - प्रतिनिधी.

 कराड येथे बालकांचे मोफत शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.ता. 15 ते जानेवारी 18  अखेर  सिव्हिल हॉस्पिटल सातारा व सायन हॉस्पिटल मुंबई यांच्या समन्वयाने कराड येथील उपजिल्हा रुग्णालय  येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मार्फत 0 ते 18 वयोगटातील बालकांचे मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजन करण्यात झाले.होते. जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल हॉस्पिटल  सातारा डॉ युवराज करपे,  वैद्यकीय अधिक्षक  उपजिल्हा रुग्णालय कराड डॉ.सुनिला लाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ पारस कोठारी व त्यांची टीम यांनी शिबिरात68बालकांवर  हर्निया, UNDT इ 23मोठ्या व Phimosis ,Tounge Tie इ  48अश्या एकूण 71शस्त्रक्रिया केल्या.सदर शिबिरास डॉ प्रशांत देसाई  ,डॉ मोहोळकर ,डॉ आरती माने , श्रीमती कांबळे व श्रीमती मंगल जानकर, नर्सिंग इन्चार्ज व श्रीमती आसिया पठ्ठनकुडे  यांनी विशेष सहकार्य केले. तसेच रोटरी क्लब ऑफ कराड चे अध्यक्ष डॉ शेखर कोगनुळकर, सचिव विनायक राऊत डॉ मनोज जोशी यांचे सहकार्य लाभले उपजिल्हा रुग्णालयातील OT इन्चार्ज श्रीमती  पोतदार मॅडम व Nursing स्टाफ, श्री शेटे सर फार्मसी  विभाग, लॅब व XRay विभाग तसेच सर्व अधिकारी कर्मचारी यांनी कॅम्प यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. या शिबिराच्या माध्यमातून कराड ,माण ,खंडाळा पाटण व सातारा तालुक्यातील लाभार्थ्यांनी लाभ घेतला.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .