वारणा विद्यालय, सागाव मध्ये 'अभ्यासाचा भोंगा' उपक्रमाकरिता पालक - मेळावा.

 वारणा विद्यालय, सागांव मध्ये 'आभ्यासाचा भोंगा' उपक्रमाकरिता पालक - मेळावा.

 शिराळा - प्रतिनिधी.

वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,सागांव मध्ये सागांव ग्रामपंचायत व वारणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सागांव संयुक्त विद्यमाने'अभ्यासाचा भोंगा'उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सागांव गावच्या लोकनियुक्त सरपंच मा. आस्मिता पाटील मॅडम होत्या.या पालकमेळाव्यात पालक-शिक्षक समिती,सखी सावित्री समिती, विद्यार्थी सखी सुरक्षा समिती इत्यादी सर्व समितीचे अध्यक्ष व सदस्य व मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए.सी. सदावर्ते, सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर सेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.या उपक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री. व्ही.डी. पाटील  यांनी केले.याप्रसंगी प्रा. बी.एम.नलवडे  यांनी अभ्यासाचा भोंगा उपक्रमात ग्रामपंचायत सागांव मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन केले. तसेच अभ्यास भोंगा ही काळाची निकड असून प्रत्येक विद्यार्थी अभ्यासकेंद्री बनावा, विद्यार्थ्यामध्ये वाढता मोबाईलचा वापर,टी. व्ही. वरील मनोरंजनाकडे वाढता कल यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून दूर जात असल्यामुळे विद्यार्थ्यांमधील प्रगती खुंटलेली दिसते.विद्यार्थ्यांना वाचन गोडी निर्माण व्हावी, अभ्यास करण्यास प्रवृत्त करणे, विद्यार्थी मनोवृत्तीला ज्ञानाभिमुख करून समाज व देश विकास स्वप्न साकार करण्याचीआवश्यकता प्रतिपादन केली. पालकांनी विद्यार्थ्यांना रात्री ७ ते ९ या कालावधीत टी.व्ही. व मोबाईल पासून १००% अलिप्त राहून अभ्यास करावा असे आवाहन केले.विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका ए. आर. पाटील-साळुंखे  यांनी विद्यालयाकडून विद्यार्थी विकासाकरिता राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थी-पालकांची अभ्यासाचा  भोंगा प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे सांगितले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. सी.सदावर्ते सर यांनी विद्यार्थ्यांमधील वाढता मोबाईलचा वापर, त्यांचे विविध दुष्परिणाम सांगून वाचन संस्कृतीची जोपासना करावी.बदलता काळ, स्पर्धा यांत टिकण्यासाठी वाचन एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. वाचनातून विद्यार्थी स्वविकास घडवावा, विविध स्पर्धातून

व्यक्तिमत्व विकास घडवावा, या उपक्रमाप्रसंगी सांगवीच्या लोकनियुक्त सरपंच मा. अस्मिता पाटील यांनी ‘अभ्यासाचा भोंगा'

उपक्रमाची माहिती दिली. यासाठी ग्रामपंचायतीन प्रशासनाच्यावतीने विशेष समिती संयोजित केली असून 'अभ्यासाचा भोंगा' उपक्रम राबविण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन संस्कृतीची आदर्श गाव संकल्पना सत्यात उतरवावी, असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन यु. आर. पाटील  यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. एस. एच. इंगवले  यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .