वृंदावन पोलीस टाऊनशिप’ चे उद्घाटन मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न.

 

वृंदावन पोलीस टाऊनशिप’ चे उद्घाटन मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न. 


 गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई यांच्या माध्यमातून, पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा अंतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी उभारण्यात आलेल्या ६९८ सदनिकांच्या ‘वृंदावन पोलीस टाऊनशिप’ चे उद्घाटन मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. या सोहळ्यास उपस्थित राहून सदिच्छा देत पोलीस बांधवांशी संवाद साधला. राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व कर्तव्यनिष्ठ पोलीस बांधवांना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. पोलीस बांधवांच्या सुरक्षित, सुसज्ज व सन्मानजनक निवासासाठी उभारलेली ही टाऊनशिप त्यांच्या दैनंदिन जीवनात स्थैर्य आणि आत्मविश्वास देणारी ठरेल. समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलीस दलाच्या कल्याणासाठी उचललेले हे पाऊल पोलीस बांधवांना दिलासा देईल. याच अनुषंगाने कराड शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नवीन पोलीस चौकी, गार्डरूम, सब-जेल, शस्त्रागार तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थाने उभारण्यासाठी ₹१२५ कोटी निधी मंजूर करण्यात यावा, याबाबत विनंतीपत्र मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  सादर केले.याप्रसंगी समवेत पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, आ. मनोज घोरपडे, आ. महेश शिंदे, आ. शशिकांत शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक मा. सुनील फुलारी व इतर मान्यवर तसेच अधिकारी उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .