कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे व्याख्यान संपन्न
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे व्याख्यान संपन्न
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगाव येथे अवेअरनेस अँड प्रिव्हेंन्शन ऑफ सेक्युयल हरेसमेंट ऑफ वुमन या विषयावरती कराड पोलीस सब इन्स्पेक्टर रेखा देशपांडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी मुलींना कोणत्याही मृगजळाच्या मागे न लागता स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्यावे, स्वतःचे संरक्षण स्वतः करावे, मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करावा, आपल्या आई-वडिलांना कोणत्याही प्रकारचे संकट येईल, त्रास होईल असे वागू नये. तसेच अभ्यास नियमित पार पाडावा अशाप्रकारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमावेळी पोलीस कॉन्स्टेबल निर्भया स्कॉड सब डिव्हिजनल पोलीस ऑफिस कराड येथील पुष्पा चव्हाण याही उपस्थितीत होत्या. या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. अरुणा परीट यांनी मानले.

Comments
Post a Comment