अर्थतज्ञांच्या संशोधनातून आर्थिक विकास साधने शक्य:- प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे.

 अर्थतज्ञांच्या संशोधनातून आर्थिक विकास साधने शक्य:- प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे.


कराड -प्रतिनिधी.

 श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने 2025 मधील अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते या विषयावर भित्तीपत्रिकेचे उद्घाटन संपन्न झाले. प्रमुख उद्घाटक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, अर्थतज्ञांच्या संशोधनातून आर्थिक विकास साधने शक्य आहे. जुन्या तंत्रज्ञानाची जागा नवीन कल्पना घेतात. अल्पकाळासाठी बाजारपेठेत कधीकधी मक्तेदारी निर्माण होते परंतु यातूनच आर्थिक वाढ ही होते. जगभरात अनेक अर्थतज्ञ आहेत ज्यांच्या संशोधनातून आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. नवोपक्रम चलित आर्थिक वाढ आणि सर्जनशील विनाश यांचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल जोयल मोकीर, फिलिप ऑगीयन आणि पीटर हॉ्विट या संशोधकांना संयुक्तपणे पुरस्कार दिला गेला. त्यांचे आर्थिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अशा तज्ञांचे संशोधन अभ्यासावे व राष्ट्राच्या प्रगतीस हातभार लावावा. आज अर्थशास्त्र विभागाने अत्यंत सुंदर विषयावरती भित्तिपत्रिका तयार केली. त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो व या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करतो.

                 30 जानेवारी हुतात्मा दिनाच्या निमित्ताने सर्व उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी व गुरुदेव कार्यकर्त्यांनी दोन मिनिटे मौन पाळले. या कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी नियोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय डॉ.सारिका लाटवडे यांनी केला. कार्यक्रमाचे आभार प्रा. जयदीप चव्हाण यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा. संदीप तुपे यांनी केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .